Maratha Reservation : जरांगे पाटील म्हणतील तसं होणार नाही, विजय वडेट्टीवार आक्रमक; सरकारला दिला मोठा इशारा

राज्यात गेल्या आठ दिवसांपासून मराठा आरक्षणाचा वाद सुरू आहे. आरक्षण मिळावं म्हणून जालन्यात उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा आंदोलक या उपोषणाला बसले आहेत. आज या उपोषणाचा 12 वा दिवस आहे.

Maratha Reservation : जरांगे पाटील म्हणतील तसं होणार नाही, विजय वडेट्टीवार आक्रमक; सरकारला दिला मोठा इशारा
manoj jarangeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 2:01 PM

नागपूर | 9 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षणाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 12 वा दिवस आहे. आरक्षणासाठी आजही मराठा समाज रस्त्यावर उतरला. अनेक ठिकणी निदर्शने आणि आंदोलने सुरूच आहेत. काही ठिकाणी तर बंदचीही हाक देण्यात आली होती. हे आंदोलने सुरू असतानाच आता ओबीसी नेतेही आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी पुढे आल्याने ओबीसी नेते आक्रमक झाले असून त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास तीव्र विरोध केला आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. जरांगे पाटील यांनी म्हणावं आणि सर्वच मान्य करावं असं काही नाही. कायद्यानुसार, चौकटीत बसत असले तर त्यांना आरक्षण द्यायला हरकत नाही. जरांगे पाटील यांनी ओबीसीतून आरक्षण द्या म्हटलं तर ओबीसी समाज ते मान्य करणार नाही, जरांगे पाटील म्हणणार तसंच होणार नाही, असा इशाराच विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

भांडणं लावू नका

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगे पाटील यांची मागणी संवैधानीक नाही. असं प्रमाणपत्र देता येत नाही. वंशावळीत राज्य सरकारने काही गडबड केली तर आम्ही विरोध करू. सरकारला आंदोलन संपवायचं असेल तर ते सरकारने ठरवावं. ओबीसी आणि मराठ्यामध्ये भांडण लावू नका. आपली पोळी शेकू नका. जातीनुसार जनगणना करा आणि आरक्षण द्या, असं आवाहन वडेट्टीवार यांनी केलं.

ओबीसींच्या हक्कात वाटेकरी नकोच

ओबीसी समाजाचं उद्या आंदोलन सुरु होत आहे, त्या आंदोलनात मी सहभागी होणार आहे. मी ओबीसी कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझा ओबीसी आंदोलनाला पाठिंबाच असेल. ओबीसींच्या हक्कात कोणी वाटेकरु होऊ नये. त्यामुळे उद्यापासुन सुरु होणाऱ्या ओबीसी आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. घटनादुरुस्ती करुन मराठा समाजाला आरक्षण द्यावं. आमची हरकत नसेल. उलट आम्ही त्याला पाठिंबाच देऊ, असंही वडेट्टीवार म्हणाले.

जरांगे पाटील यांना स्पष्टच सांगितलं…

विरोधीपक्ष नेता म्हणून मी जरांगे पाटील यांना भेटलो, उपोषण सोडावं असं त्यांना सांगितलं. ओबीसींच्या 27 टक्क्यात तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. तुम्हाला आरक्षण हवं असेल तर ते वाढवून घ्या. त्यासाठी टक्का वाढवा. तुम्हाला स्वतंत्र आरक्षण घ्या. आमची काहीच हरकत नाही, असं जरांगे पाटील यांना सांगितल्याचंही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.