Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hadapkya Ganapati : नागपुरातील भोसल्यांच्या वाड्यात हडपक्या गणपती, सव्वादोनशे वर्षांची परंपरा काय?

दहा दिवस हा उत्सव साजरा केला जातो . आज गणपती बाप्पाची स्थापना झाली. मस्कऱ्या गणपतीची स्थापना श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले उर्फ चिमणाबापू यांनी बंगालचा विजय मिळविल्यानंतर केली होती. पितृपक्षात मस्कऱ्या गणपतीची प्रतिष्ठापना केल्याचे ऐतिहासिक दाखले आहेत.

Hadapkya Ganapati : नागपुरातील भोसल्यांच्या वाड्यात हडपक्या गणपती, सव्वादोनशे वर्षांची परंपरा काय?
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 9:08 PM

नागपूर : नागपुरात गणपती विसर्जनानंतर हडपक्या गणपतीची स्थापना होते. 235 वर्षाची परंपरा आहे. नागपूरचे राजे भोसले यांच्या राजवाड्यात 235 वर्षापासून बाप्पाची स्थापना केली जात आहे. या बाप्पाला मस्कऱ्या गणपती (Maskaraya Ganapati) नावानेसुद्धा संबोधले जाते. नवसाला पावणारा गणपती अशी सुद्धा याची प्रचिती आहे. आज गणेश चतुर्थीच्या दिवशी या हडपक्या गणपतीची स्थापना भोसलेंच्या राजवाड्यात (in the palace) करण्यात आली.

विजयाचा केला जल्लोष

सतराशेच्या दशकात तत्कालीन राजे चिमाजी भोसले यांनी बंगालवर विजय मिळविला. त्यानंतर ते आपल्या राज्यात म्हणजे नागपुरात परत आले. तेव्हा गणपतीचा उत्सव संपलेला होता. मात्र चिमाजी भोसले यांनी गणपती बाप्पाकडे विजयाचा नवस केला होता. या विजयाचा जल्लोष त्यांना करायचा होता म्हणून त्यांनी पंडितांना विचारून हडपक्या गणपतीची स्थापना केली .

जुन्या नव्या संस्कृतीचा मेळ

तेव्हापासून आजपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. विजयाचा उत्सव होता. त्या काळामध्ये असलेल्या सांस्कृतिक कला, मस्कऱ्या मज्जा या माध्यमातून व्यक्त केल्या गेल्या. म्हणून याला मस्कऱ्या गणपती, असं सुद्धा संबोधलं जातं. आजही त्या परंपरा तशाच सुरू आहेत. तत्कालीन सांस्कृतिक कला आणि आताच्या सांस्कृतिक कला यांचा या माध्यमातून मेळ घातला जातो.

हे सुद्धा वाचा

दहा दिवस हा उत्सव साजरा केला जातो . आज गणपती बाप्पाची स्थापना झाली. मस्कऱ्या गणपतीची स्थापना श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले उर्फ चिमणाबापू यांनी बंगालचा विजय मिळविल्यानंतर केली होती. पितृपक्षात मस्कऱ्या गणपतीची प्रतिष्ठापना केल्याचे ऐतिहासिक दाखले आहेत.

विदर्भात नागपुरव्यतिरिक्त वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा तसेच विदर्भात मस्कऱ्या गणपतीची स्थापना केली जाते. श्रीमंत खंडोजी महाराजांच्या काळात या गणपतीची 12 हातांची, 21 फुटांची मूर्ती स्थापन केली जात होती. नवसाला पावणारा गणपती अशी या मस्कऱ्या गणपतीची प्रचिती येते.

जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की..
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की...
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू.
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी.
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.