मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातल्या आरोपीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, दाऊदचा राईट हँड सलीम कुत्ता नेमका कोण आहे?

विधानसभेत नितेश राणेंनी, ठाकरे गटाच्या बडगुजरांवर दाऊदच्या साथीदारासोबत डान्स केल्याचा आरोप केला. त्या डान्सचे व्हिडीओही समोर आले. त्यानंतर सुषमा अंधारेंनी त्या व्हिडीओवरुन, भाजप नेत्यांवरच पलटवार केला. दाऊदच्या नातेवाईकांच्या लग्नात भाजपचे नेतेही हजर असल्याचे फोटो अंधारेंनी दाखवलेत.

मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातल्या आरोपीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, दाऊदचा राईट हँड सलीम कुत्ता नेमका कोण आहे?
salim kutta
Follow us
| Updated on: Dec 16, 2023 | 12:40 AM

नागपूर | 15 डिसेंबर 2023 : ‘मै हूं डॉन गाण्यावर’, दाऊदचा राईट हँड सलीम कुत्तासोबत ठाकरे गटाचे नेते, सुधाकर बडगुजरांचा डान्सचा हा व्हिडीओ 6 वर्षांआधीचा आहे. पण त्यावरुन भाजपचे आमदार नितेश राणेंनी नाशिकचे ठाकरे गटाचे नेते, सुधाकर बडगुजर यांच्या अटकेची मागणी केलीय. मुंबईच्या 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा भोगत असलेला सलीम कुत्ता पॅरोलवर 6 वर्षांआधी बाहेर आला होता. त्यावेळी कुत्तासोबत बडगुजरांनी पार्टी केल्याचा आरोप राणेंनी केलाय. आपला सलीम कुत्ताशी संबंध नाही. भेट झाली असेल किंवा मॉर्फिंग केलं असेल असं सुधाकर बडगुजर म्हणतायत. मात्र नितेश राणेंनंतर शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री दादा भूसे विधानसभेत आक्रमक झाले.

सलीम कुत्ता कोण आहे?

सलीम कुत्ता याचं खरं नाव मोहम्मद सलीम मीर शेख असं आहे. मोहम्मद शेख उर्फ सलीम कुत्ता 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी आहे. कोर्टाने सलीम कुत्ताला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर सुप्रीम कोर्टाने 2013 साली ही शिक्षा वैध ठरवली. सलीम कुत्तावर स्फोटात वापरलेले साहित्य पुरवल्याचा आरोप आहे. बॉम्बस्फोटातील महत्त्वाचा आरोपी मोहम्मद डोसा याची मोहम्मद शेथ उर्फ सलीम कुत्ताशी जवळीक आहे.

मोहम्मद डोसा याच्याशी संपर्क ठेवून शस्त्रसाठा पुरवल्याचा आरोप सलीम कुत्तावर आहे. गुजरातमधून हा शस्त्रसाठा जमा करुन तो महाराष्ट्रात आणण्यात आला होता. हाच साठा स्फोटांसाठी वापरला गेला होता. सलीम कुत्तावर रायगडच्या शेखाडी किनाऱ्यावर उतरवलेले RDX पुरवल्याचाबी आरोप आहे. बॉम्बस्फोटासाठी गुजरातमधून शस्त्रसाठा आणण्यात सलीम कुत्ताची भूमिका होती. अंडरवर्ल्ड डॉन टायगर मेमनसाठी सलीम कुत्ता काम करत होता. टायगर मेमन आणि जावेद चिकनानंच 1993च्या बॉम्बस्फोटाचा कट रचला होता.

राजकारणात तुफान घडामोडी

ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर यांचा सलीम कुत्तासोबत डान्स समोर आल्यानंतर, गृहमंत्री फडणवीसांनीही SITद्वारे चौकशीची घोषणा केली. नितेश राणेंनी, सलीम कुत्तासोबत बडगुजरांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सुषमा अंधारेंनीही या व्हिडीओची कहानीच सांगितली. सलीम कुत्ता आणि बडगुजरांचा व्हिडीओ, दाऊदच्या नातेवाईकाच्या मुलाच्या लग्नातला आहे आणि त्याच लग्नात मंत्री गिरीश महाजन आणि तत्कालीन भाजपचे आमदार बाळासाहेब सानप उपस्थित होते. तो फोटो अंधारेंनी समोर आणलाय. याच फोटोत व्यावसायिक विक्रांत चांदवडकरही होते. त्या लग्नात ठाकरे गटाचे त्यावेळी नाशकातले बरेच नेते उपस्थित होते असं चांदवडकर म्हणालेत. ज्या बडगुजरांवर आरोप झालेत…ते बडगुजरांचाही परिचय जाणून घेवूयात…

सुधाकर बडगुजर कोण आहेत?

सुधाकर बडगुजर शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख आहेत. त्यांनी 2014साली विधानसभा निवडणूक अपक्ष लढली, मात्र निवडणुकीत पराभव झाला. त्यांनी नाशिक महानगरपालिकेत ठाकरे गटाकडून सभागृह नेता, विरोधी पक्षनेता पदांवर काम केलंय. ते 2017 साली शिवसेनेकडून महापौर पदाचे उमेदवार होते. सुधाकर बडगुजर नाशिक महापालिकेत म्युनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत. सुधाकर बडगुजर आणि त्यांच्या पत्नी हर्षाताई बडगुजर दोघांनीही नगरसेवक म्हणून काम पाहिलंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राणेंनी केलेल्या मारहाणीच्या वक्तव्यावरुन याच, बडगुजरांनी नारायण राणेंविरोधात पहिला गुन्हा दाखल केला होता. आता नितेश राणेंनी व्हिडीओ बाहेर काढलाय.

ज्या व्हिडीओवरुन, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी विधानसभेत SITची मागणी केली. त्याच लग्न सोहळ्यात त्यावेळी भाजपचेही मंत्री आणि आमदार सहभागी होते. असे फोटो अंधारेंनी समोर आणलेत. आता SIT चौकशी सुरु होईल. त्याआधी नाशिक पोलिसांनीही बडगुजरांना चौकशीसाठी बोलावलंय.

Non Stop LIVE Update
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.