Nagpur Crime | महिलेचा न्यायालयीन परिसरात आत्महत्येचा प्रयत्न, चाकूने स्वतःवर सपासप वार, नागपूर पोलिसांनी हिसकावला चाकू

गुडिया शाहू या कालावधीत नागपुरात न राहता रायपूरला गेली. गुरुवारी गुडिया सरेंडर झाली. जिल्हा सत्र न्यायालयाने तिला ताब्यात घेण्याचा आदेश दिला. यावेळी गुडिया ही चाकू सोबत घेऊन आली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर तिने स्वत:वर चाकूने वार केले. आत्महत्या करण्याचा प्रयत्न पोलिसांसमोरच न्यायालय परिसरात केला. पोलिसांनी सतर्कता बाळगत तिला अटक केली.

Nagpur Crime | महिलेचा न्यायालयीन परिसरात आत्महत्येचा प्रयत्न, चाकूने स्वतःवर सपासप वार, नागपूर पोलिसांनी हिसकावला चाकू
सुनील ढगे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jul 01, 2022 | 3:04 PM

नागपूर : गुडिया शाहू ही कांबळे (Kamble) दुहेरी हत्याकांडातील आरोपी आहे. तिने नागपूर जिल्हा न्यायालयीन (District Court) परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला. गुडिया हिने सोबत आणलेल्या चाकूने स्वत:वर सपासप वार केले. त्यानंतर ती ओरडू लागली. जोराजोरानं रडू लागली. नागपूर पोलिसांनी सतर्कता दाखवत तिच्या हातातील चाकू हिसकावला. या घटनेनंतर न्यायालयीन परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी सदर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली. आरोपी गुडिया शाहू हिला अटक केली आहे. कांबळे दुहेरी हत्याकांडात गणेश शाहू व गुडिया गणेश शाहू हे मुख्य आरोपी आहे. त्यांच्या विरोधात सत्र न्यायाधीश एस. बी. गावंडे यांच्या न्यायालयात खटला सुरू आहे. न्यायपीठ न्यायालय इमारतीच्या पाचव्या माळ्यावर आहे. या हत्याकांडातील खटल्यात सरकारी साक्षीदार (Government Witness) तपासले जात आहेत. गुडिया शाहूला कोरोनातील अधिसूचनेमुळे तात्पुरता जामीन मिळाला होता.

कोरोना काळात घरी जाण्याची मिळाली होती मुभा

कोरोना कालावधीत कोरोनाची लागण होऊ नये म्हणून सर्व कैद्यांना जामिनावर घरी जाण्याची मुभा दिली होती. कोरोना काळ संपला व परिस्थिती आटोक्यात आली. त्यानंतर जे कैदी घरी गेले त्यांना सात दिवसांच्या आत सरेंडर होण्याचे आदेश राज्य शासनाने दिले. गुडिया शाहू या कालावधीत नागपुरात न राहता रायपूरला गेली. गुरुवारी गुडिया सरेंडर झाली. जिल्हा सत्र न्यायालयाने तिला ताब्यात घेण्याचा आदेश दिला. यावेळी गुडिया ही चाकू सोबत घेऊन आली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर तिने स्वत:वर चाकूने वार केले. आत्महत्या करण्याचा प्रयत्न पोलिसांसमोरच न्यायालय परिसरात केला. पोलिसांनी सतर्कता बाळगत तिला अटक केली.

काय आहे कांबळे दुहेरी हत्याकांड

कांबळे दुहेरी हत्याकांडाची घटना 17 फेब्रुवारी 2017 रोजी घडली. त्या दिवशी गणेश शाहू व उषा कांबळे यांचा भिसीच्या सात हजार रुपयांवरून वाद झाला होती. गणेश व गुडिया शाहू यांनी उषा कांबळे यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या दीड वर्षीय राशीचाही खून केला. त्यानंतर उषा कांबळे आणि चिमुकलीचा मृतदेह उमरेड रोडवरील विहीरगावजवळच्या नाल्यात फेकला. या घटनेचा पाच वर्षे झाली आहेत. या प्रकरणातील गुडिया शाहू आरोपी आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें