Z. P. च्या विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेच नाही, दिवाळीनंतर झाल्या शाळा सुरू

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना सरकारकडून मोफत गणवेश वाटप केले जाते. वर्षातून दोन गणवेश वाटप केले जातात. यंदा एक गणवेश वाटप करण्याचे नियोजन आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेशासाठी तीनशे रुपयांचे अनुदान दिले जाते. ही रक्कम शाळेच्या खात्यात पीएफएमएस प्रणालीच्या माध्यमातून जमा केली जाते.

Z. P. च्या विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेच नाही, दिवाळीनंतर झाल्या शाळा सुरू
Z. P. Uniforms

नागपूर : सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले जाते. यंदा दिवाळीपूर्वी कोरोना विषाणुमुळे शाळा सुरू नव्हत्या. त्यामुळं सुरुवातीला गणवेश मिळू शकले नाही. आता दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु, अद्याप गणवेश न मिळाल्यानं विद्यार्थी नाराज आहेत. यंदा गणवेश वाटप होणार की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना सरकारकडून मोफत गणवेश वाटप केले जाते. वर्षातून दोन गणवेश वाटप केले जातात. यंदा एक गणवेश वाटप करण्याचे नियोजन आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेशासाठी तीनशे रुपयांचे अनुदान दिले जाते. ही रक्कम शाळेच्या खात्यात पीएफएमएस प्रणालीच्या माध्यमातून जमा केली जाते.

गणवेशासाठी पात्र विद्यार्थी 64,193

नागपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1,530 शाळा आहेत. गणवेश योजनेसाठी पात्र विद्यार्थी 64,193 आहेत. गणवेश खरेदीसाठी 3 कोटी 85लाख 75800 रुपये निधी अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारला निधी दिला जातो. राज्य सरकार सरळ शाळेच्या खात्यात ही रक्कम वळती करते. पण, अद्याप ही रक्कम शाळेच्या खात्यात आलेली नाही. आधी शाळेच्या कोणत्याही बँकेच्या खात्यात निधी जमा केला जात होता. वेगवेगळ्या शाळांचे खाते वेगवेगळ्या बँकांत होते. विविध बँकेत निधी स्थानांतरण करण्यास उशीर होत होता. त्यामुळे सर्व शाळांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाते खोलले. 99 टक्के शाळांनी बँक खाते खोलले असल्याची माहिती आहे. तरीही गणवेशाचा निधी केव्हा मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

विद्यार्थी शाळेत जाण्यास अनुत्सुक

शासन यू-डायस अनुसार विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा निधी वितरित करत असते. गट शिक्षणाधिकारी ते तहसील स्तरावर विद्यार्थ्यांची संख्या मागविण्यात आली आहे. लवकरच गणवेशाचा निधी मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रमोद वानखेडे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी हे गरीब असतात. त्यामुळं त्यांना सरकार गणवेशासाठी निधी उपलब्ध करून देतो. परंतु, सरकारी लेटलतिफीमुळं यंदा अद्याप गणवेशाचा निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळं विद्यार्थीही शाळेत जाण्यास फारसे उत्सुक दिसून येत नाहीत.

इतर बातम्या 

Video नागपुरात जमावबंदी असतानाही भाजपचा मोर्चा, गुंठेवारी विकास शुल्क कमी करण्याची मागणी

100 नक्षल्यांशी सामना, 26 जणांना कंठस्नान, गडचिरोलीच्या जंगलात नेमकं ऑपरेशन कसं राबवलं गेलं?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI