AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या विखारी प्रचाराला महाराष्ट्र काँग्रेसचे 2 लाख ‘गांधीदूत’ चोख उत्तर देणार : नाना पटोले

महाराष्ट्रातील काँग्रेसचे 2 लाख गांधीदूत भाजपच्या विखारी प्रचाराला चोख उत्तर देतील," असं मत काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलंय.

भाजपच्या विखारी प्रचाराला महाराष्ट्र काँग्रेसचे 2 लाख ‘गांधीदूत’ चोख उत्तर देणार : नाना पटोले
| Updated on: Feb 11, 2021 | 10:13 PM
Share

मुंबई : “भारतीय जनता पक्ष हा सोशल मीडियाच्या माध्यमातून विखारी प्रचार करत आहेत. समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. परंतु भाजपच्या या विखारी प्रचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी काँग्रेसचा सोशल मीडियाही सक्रीय झाला आहे. सोशल मीडियाच्या या मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील काँग्रेसचे 2 लाख गांधीदूत भाजपच्या विखारी प्रचाराला चोख उत्तर देतील,” असं मत काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलंय. काँग्रेसच्या सोशल मीडिया मोहिमेचे उद्घाटन नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते (Nana Patole criticize IT cell of BJP for misinformation on Social Media).

नाना पटोले म्हणाले, “राजीव गांधी यांनी देशाला एकविसाव्या शतकात नेण्याचे स्वप्न पाहून आधुनिक तंत्रज्ञान आणले. त्यावेळी हेच भाजपावाले त्याला तीव्र विरोध करत होते. मात्र, त्याच तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून भाजप आज समाजात खोटी माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करत आहे. परंतु त्यांना आता काँग्रेसकडूनही चोख उत्तर मिळेल. भाजपकडून केला जात असलेला अपप्रचार काँग्रेस सकारात्मकतेने खोडून काढेल आणि सत्य माहिती जनतेसमोर आणेल. भाजपकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने अपप्रचार केला जातो. भाजप ही खोटी माहिती पसरवणारी मोठी फॅक्टरी आहे. पण आता याच माध्यमातून भाजपला काँग्रेसकडून उत्तर मिळेल.”

‘भाजपकडून सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात अपप्रचार’

“भाजपकडून सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात अपप्रचार केला जातो. देशात आज 16 ते 35 वयोगटातील तरुणवर्गाची लोकसंख्या 62 टक्के आहे. सोशल मीडियाचे महत्व ओळखून देश वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, शेतकरी वाचवण्यासाठी या मोहिमेत तरूणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असं आवाहन महाराष्ट्र काँग्रेस सोशल मीडियाचे अभिजित सपकाळ यांनी केलं.

‘एका महिन्यात महाराष्ट्रातून 2 लाख लोकांना या मोहिमेत जोडणार’

गौरव पंधी म्हणाले, “सोशल मीडियावर काँग्रेस मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे. कोरोना काळात हेच माध्यम संपर्काचे मुख्य साधन राहिले. देशभरात काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. तसेच डिजीटल माध्यमावरही काँग्रेसचे कार्यकर्ते आता गावपातळीपर्यंत सक्रीय आहेत. हे कार्यकर्ते, समर्थक यांना एका छताखाली आणण्यासाठी ही मोहिम राबवली जात आहे. जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी ही मोहिम आखण्यात आली आहे. हे एक आंदोलनच आहे. एका महिन्यात महाराष्ट्रातून 2 लाख लोकांना या मोहिमेत जोडण्याचे लक्ष्य ठेवले आहे.”

दरम्यान, याआधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सकाळी सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर दादर येथील जैन मंदिराला भेट दिली. नंतर चैत्यभूमीवर जाऊन महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केलं. तसेच माहीम दर्गा येथे जाऊन चादर अर्पण केली आणि माहीम चर्चला भेट दिली. त्यानंतर पटालेंनी गुरु तेग बहादूर नगर येथील दशमिरा दरबार गुरुद्वारा येथे जाऊन अभिवादन केलं.

नाना पटोले ऑगस्ट क्रांती मैदानावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारणार

नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पदग्रहण कार्यक्रम शुक्रवारी (12 फेब्रुवारी) ऑगस्ट क्रांती मैदानावर होत आहे. मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याला नाना पटोले पुष्पहार अर्पण करतील. तसेच विधानभवन येथील महापुरुषांना आणि दक्षिण मुंबईतील महापुरुषांना ते अभिवादन करतील. हुतात्मा चौकात जाऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करतील. त्यानंतर मंत्रालयापासून ट्रॅक्टरने गिरगाव चौपाटीपर्यंत प्रवास करतील तेथे लोकमान्य टिळक पुतळ्यास तसेच सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन तेथून ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत बैलगाडीने प्रवास करतील. पदग्रहण सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम ऑगस्ट क्रांती मैदान येथे होत आहे.

यावेळी नाना पटोले, बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, सोनल पटेल, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, सोशल मीडिया विभागाचे राष्ट्रीय समन्वयक गौरव पंधी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष अभिजीत सपकाळ, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, आ. वजाहत मिर्झा, आ. विक्रम सावंत, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, प्रकाश सोनावणे, डॉ. राजू वाघमारे, डॉ. संजय लाखे पाटील, सोशल मीडिया विभागाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य राजेश चटवाल आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

इंग्रजही सत्तेतून पायऊतार, देशाचा कारभार चालवणाऱ्या मूठभरांच्या सरकारला खाली खेचणार: नाना पटोले

आधी सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांना भेट, नंतर बैलगाडीतून येऊन प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार, नाना पटोले कामाला लागले

पक्षानं आदेश दिल्यास नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीतून लढणार, नाना पटोलेंचे थेट आव्हान

व्हिडीओ पाहा :

Nana Patole criticize IT cell of BJP for misinformation on Social Media

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.