AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदींचा परिवार म्हणजे ते स्वत: अन्…; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

Uddhav Thackeray on Narendra Modi : नांदेडमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. नरेंद्र मोदी यांच्यावरही ठाकरेंंनी जोरदार घणाघात केला आहे. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

नरेंद्र मोदींचा परिवार म्हणजे ते स्वत: अन्...; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
Uddhav ThackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 24, 2024 | 4:39 PM
Share

नरेंद्र मोदीजी तुम्हाला मंगळसूत्रंचे महत्व माहित आहे का? 50 खोके द्यायला पैसा आहे यांच्याकडे, मात्र शेतीमालाला द्यायला नाही. हीच वेळ आहे यांची मस्ती गाडायची. नरेंद्र मोदींचा परिवार म्हणजे खुर्ची आणि मोदी हाच आहे. जनतेने ठरवावे घराने शाही कोणती ठरवयची.मोदी शाहा ठरवू शकत नाहीत. मोदी सरकार नको भारत सरकार पाहिजेत. शब्द काढण्यासाठी निवडणूक आयोग यांचा घरगडी यांनी प्रेम पत्र दिलं, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

नांदेडमधला चिखल साफ करा. नांदेडमधले मोदी यांचे 2019 चे भाषण काढा आणि आतचे भाषण आदर्श घोटाळा? 70 हजार कोटी घोटाळ्यावाल्याला उपमुख्यमंत्री करतात तर मुख्यमंत्री यांना काय करतात. चोराच्या हातात च्याव्या! 400च्या वर पाहिजेत ह्यांना घटना बदलण्यासाठी. माझा वचननामा महाराष्ट्राची लूट थांबवणं हा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मोदींवर घणाघात

मोदी म्हणतात ही नकली शिवसेना हे मान्य आहे का? ही बोगस जनता पार्टी झालेली आहे. आपली शिवसेना पळवली चोरली मात्र मी या चोरांचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही. यांना निवडून देऊ नका. कारण तुमच्या सात बारावरती गद्दाराचं नाव दिले. तर तुमच्याकडे यंत्रणा आहे का? नरेंद्र मोदींजी तुम्ही बैल बघितला पण शिंगं बघितली नाहीत… महाराष्ट्रतील जनता सज्ज आहे. शिंगावर घेतल्या शिवाय राहणार नाही. आगडोंम उसळला आहे, मोदीजी हे तुम्ही आता थांबू शकत नाही. महागाईच्या माध्यमातून तुम्हाला लुटलं जातेय, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर घणाघात केलाय.

नांदेडकरांना आवाहन काय?

नांदेडमधला चिखल साफ करा. नांदेडमधले मोदी यांचे 2019 चे भाषण काढा आणि आतचे भाषण आदर्श घोटाळा? 70 हजार कोटी घोटाळ्यावाल्याला उपमुख्यमंत्री करतात तर मुख्यमंत्री यांना काय करतात. चोराच्या हातात च्याव्या! 400च्या वर पाहिजेत ह्यांना घटना बदलण्यासाठी… माझा वचननामा महाराष्ट्राची लूट थांबवणं हा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

चार जूननंतर या गद्दारांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल. जिल्ह्यात मविसा चे उमेदवार मोठ्या मस्तानी विजयी करा. गुंडागर्दी वरती नांगर फिरवा. यांची वडिलोपार्जित संपत्ती नाही, संतोष बागर यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांना टोला लगावला आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.