AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरेंना यांनीच छळले होते, आता का म्हणून… नारायण राणे ट्विटमध्ये असं काय म्हणाले ?

नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनोमिलनावर तीव्र टीका केली आहे. राणे यांनी उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंना पक्षातून काढण्याचा आरोप केला आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंना खोचक शब्दांत सुनावलेही.

राज ठाकरेंना यांनीच छळले होते, आता का म्हणून... नारायण राणे ट्विटमध्ये असं काय म्हणाले ?
नारायण राणेंनी केली सडकून टीकाImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jul 01, 2025 | 10:48 AM
Share

राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना ठाकरे गट आणि मनसेतर्फे आवाज उठवत या निर्णयाचा जोरदार विरोध करण्यात आला. त्यासंदर्भात 5 जुलैला मोर्चाचेही आयोजन करण्यात आले होते. अखेर सरकारने यासंदर्भातील 2 जीआर रद्द केल्याची घोषणा केली आणि मराठी माणूस, मराठी अस्मितेचा विजय झाल्याची प्रतिक्रिया ठाकरे बंधूंनी दिली. गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव हे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, एकत्र येण्याच्या अनेक चर्चा सुरू आहेत, मराठीच्या मुद्यावरून तर दोघेही विजयी मेळाव्यातही एकत्र दिसणार आहेत. मात्र, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याने महायुतीच्या नेत्यांनी धसका घेतल्याचं चित्र आहे. या विजयी मेळाव्यापूर्वीच ठाकरे बंधूंवर महायुतीचे नेते टीका करताना दिसत आहेत. काही नेते तर उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करून त्यांना टोमणे मारतानाही दिसत आहेत.

याच पार्श्वभूमीवर, एकेकाळी कट्टर शिवसैनिक असलेले पण नंतर बाहेर पडून, अनेक पक्षांतरं करून आता भाजपावासी झालेले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर प्रतिक्रिया देत टीकास्त्र सोडलं आहे. ” याच उद्धव ठाकरेंनी राज जी ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटतं ? आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत” असे म्हणत नारायण राणेंनी कडाडून टीका केली आहे.

परत या म्हणून का प्रयत्न करत आहेत ?

नारायण राणे यांनी X या सोशल मीडिया साईटवरील अकाऊंटवरून त्यांची भूमिका मांडली आहे. त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंवर यथेच्छ टीका करतानाच त्यांना खोचक शब्दात सुनावलंही आहे. ” उद्धव ठाकरे सन्माननीय राज जी ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्याने परत या असे म्हणून प्रयत्न करीत आहेत. मला आठवते याच उद्धव ठाकरेंनी राज जी ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटतं ? आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत. ” असा सवाल राणेंनी विचारला आहे.

जो बूंद से गई वो हौद से नहीं आती !

तसेच, सन्माननीय राज जी, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसविले याने सत्ता घालविली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे. मराठी माणसाने व हिंदूंनी याला घरी बसवले. गेलेले परत मिळवण्याची धमक व क्षमता उद्धव ठाकरे मध्ये नाही ! जो बूंद से गई वो हौद से नहीं आती ! असेही राणेंनी सुनावलंय.

त्यांच्या या टीकास्त्राला आता उद्धव ठाकरे काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.