नरेंद्र पाटलांची आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर घणाघाती टीका, म्हणाले…

स्वार्थासाठी कोण काम करत आहे, हे संपूर्ण सातारा जिल्ह्याला माहिती असल्याचे नरेंद्र पाटील यांनी म्हटले. | Narendra Patil

नरेंद्र पाटलांची आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर घणाघाती टीका, म्हणाले...
नरेंद्र पाटील, माथाडी कामगार नेते
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 3:45 PM

पंढरपूर: माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना लक्ष्य केले आहे. पाटील यांनी शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. शशिकांत शिंदे तुमची जात काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (Narendra Patil slams NCP Shashikant Shinde)

नरेंद्र पाटील यांनी सोमवारी पंढरपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शशिकांत शिंदे यांना अक्षरश: धारेवर धरले. शशिकांत शिंदे तुमची जात काय? माझी जात माथाडी कामगार आहे. माझी पक्षनिष्ठा माथाडी कामगार आहे. स्वार्थासाठी कोण काम करत आहे, हे संपूर्ण सातारा जिल्ह्याला माहिती असल्याचे नरेंद्र पाटील यांनी म्हटले.

मांडवली करु नका, शिवेंद्रराजे-शशिकांत शिंदेंच्या वादात उडी

साताऱ्यात कोरेगाव विधानसभेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदेंना मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली. जो माणूस संघटनेचा होऊ शकत नाही, तो मतदारांचा कसा?” असा सवाल करत माथाडी नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी टीका केली होती. आपला मतदारसंघ सोडून दुसऱ्याच्या मतदारसंघात लक्ष घालू नये. तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी मांडवली करु नये, असा टोलाही नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रराजे यांना लगावला होता.

शशिकांत शिंदेंचं नरेंद्र पाटलांना उत्तर

नरेंद्र पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना शशिकांत शिंदे यांनीही जोरकस टोला लगावला. “मी नेहमी माथाडी कामगारांच्या बरोबर राहिलो आहे. जिथे पक्षाचा विषय येतो, तिथे नरेंद्र पाटील यांनी त्यांचे निर्णय घेतले. तेव्हा ना त्यांनी माथाडी कामगारांना विचारलं, ना मला. नरेंद्र पाटील यांनी कुणाशी गद्दारी केली आहे ते अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे.” अशा शब्दात शशिकांत शिंदेंनी नरेंद्र पाटलांना सुनावलं.

संबंधित बातम्या :

अहो आश्चर्यम… लग्नकार्यात शिवेंद्रराजे आणि शशिकांत शिंदे एकमेकांच्या शेजारी बसतात तेव्हा…..

मी उदयनराजेंविरोधात निवडून आलेला माणूस, समोरच्याची वाट लावल्याशिवाय गप्प बसत नाही : शिवेंद्रराजे

शिवेंद्रराजेंनी दम भरताच शिंदे नेमकं काय म्हणाले? जावळीत राजकीय संघर्ष वाढणार?

(Narendra Patil slams NCP Shashikant Shinde)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.