VIDEO | वीज कनेक्शन दोन दिवस खंडित, नाशकात संतप्त शेतकऱ्यांनी आमदारालाच कोंडलं

संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी आलेल्या आमदारालाच ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले (Nashik MLA farmers Gram Panchayat)

VIDEO | वीज कनेक्शन दोन दिवस खंडित, नाशकात संतप्त शेतकऱ्यांनी आमदारालाच कोंडलं
आमदार दिलीप बोरसेंना कार्यालयात कोंडलं


नाशिक : अवकाळी पाऊस आणि गारपिटीने वैतागलेल्या नाशकातील शेतकऱ्यांच्या त्रासात आणखी भर पडली. शेतीसाठी जोडलेले वीज कनेक्शन दोन दिवसांपासून खंडित करण्यात आले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी आलेल्या आमदारालाच ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले. भाजप आमदार दिलीप मंगळू बोरसे यांना नाशिकच्या सटाणा तालुक्यातील केरसाणे ग्रामपंचायत कार्यालयात कोंडण्यात आले होते. (Nashik BJP MLA Dilip Borse locked by farmers in Gram Panchayat office)

जोपर्यंत शेतीसाठी लागणारे वीज कनेक्शन जोडले जात नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर पडू देणार नाही, असा इशारा देत ग्रामस्थांनी कार्यालयाबाहेरच ठिय्या मांडला. महावितरणच्या आडमुठ्या धोरणाचा यावेळी ग्रामस्थांनी निषेध केला.

दरम्यान, बंद असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयातूनच तातडीने चक्रे फिरवत तात्काळ वीज जोडणी करण्याचे आदेश आमदार बोरसेंनी दिले. त्यानंतर महावितरणने वीज जोडणी सुरु केली. तेव्हा कुठे ग्रामस्थांनी आमदार दिलीप बोरसे यांना ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर सोडले. आता शेतकऱ्यांचा रोष बघता प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही.

पाहा व्हिडीओ :

 

(Nashik BJP MLA Dilip Borse locked by farmers in Gram Panchayat office)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI