नाशिकमध्ये कडक निर्बंध तरीही रुग्णसंख्या कमी होईना, गेल्या 24 तासांत धक्कादायक रुग्णवाढ

नाशिक शहर आणि जिल्ह्यात कडक निर्बंधानंतरही कोरोना रुग्णसंख्या काही केल्या कमी होताना दिसून येत नाहीय. | Nashik Corona Update

नाशिक :  नाशिक शहर आणि जिल्ह्यात कडक निर्बंधानंतरही कोरोना रुग्णसंख्या काही केल्या कमी होताना दिसून येत नाहीय. शहरात गेल्या 24 तासांत गेल्या काही दिवसांतली सर्वाधिक रुग्णसंख्या पाहायला मिळाली तर जिल्ह्यातही कोरोनाच प्रकोप पाहायला मिळतोय. (Nashik City And District corona Update Night Curfew)

नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासांत किती रुग्णवाढ?

जिल्ह्यात वसागणिक रुग्णसंख्या वाढतीये. गेल्या 24 तासात जिल्ह्यात पुन्हा 527 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. रात्रीची संचारबंदी तसंच शासनाने काही कडक निर्बंध लादल्यानंतरही नाशकात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे.

नाशिक शहरातही रुग्णवाढ कायम आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात पुन्हा 393 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शहरातील विविध रुग्णांलयात काही रुग्ण उपचार घेत आहेत तसंच काही रुग्ण होम आयसोलेशनमध्येही आहेत.

रात्रीची संचारबंदी, वेळ आली तर कठोर नियम करु- छगन भुजबळ

नाशिकमधील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नाशिकमध्ये ठोस उपाययोजना करणे बंधनकारक आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. जर कोरोना आटोक्यात आला नाही तर नियम तीव्र करु, असा इशाराही भुजबळ यांनी दिला. यापुढे नागरिकांनी मास्क लावला नाही तर 1000 रुपये दंड आकारला जाईल. तसेच त्यांच्या विरुद्ध गुन्हाही दाखल करु, असे छगन भुजबळ यांनी सांगितलं.

त्याशिवाय लग्न सोहळा करणाऱ्यांनी पोलीस परवानगी घेणे आवश्यक आहे. गोरज मुहुर्तवरील लग्न टाळा, असे आवाहनही पालकमंत्री यांनी केले. ज्या दुकानात सॅनिटायझर नसेल तर दंड करा, अशा सूचनाही मनपा अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. तसेच शाळा जैसे थे सुरु राहणार आहेत. येत्या 8 दिवस बघून शाळांबाबत निर्णय घेऊ, असेही भुजबळांनी सांगितले.

(Nashik City And District corona Update Night Curfew)

हे ही वाचा :

खासगी रुग्णालयात 250 रुपयात कोरोना लस, महाराष्ट्रातील 775 हॉस्पिटलची संपूर्ण यादी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI