AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉलेजला निघालेली तरुणी कालव्यात मृतावस्थेत, चुलतभावाने गळा दाबून संपवलं

नाशिकच्या पिंपळगाव बसवंत भागात तीन दिवसांपूर्वी दीपिका ताकाटे या अल्पवयीन तरुणीचा मृतदेह सापडला होता (Nashik College Girl Murder)

कॉलेजला निघालेली तरुणी कालव्यात मृतावस्थेत, चुलतभावाने गळा दाबून संपवलं
नाशिकमधील तरुणीची चुलतभावाकडून हत्या
| Updated on: Feb 19, 2021 | 3:34 PM
Share

नाशिक : नाशिकमध्ये आढळलेल्या तरुणीच्या मृतदेहाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. कॉलेजला जाण्यासाठी बाहेर पडलेल्या तरुणीची हत्या झाल्याचं उघडकीस आलं आहे. चुलतभावानेच तरुणीची हत्या केल्याचा आरोप आहे. (Nashik College Girl Murder case solved Cousin killed)

नाशिकच्या पिंपळगाव बसवंत भागात तीन दिवसांपूर्वी दीपिका ताकाटे या अल्पवयीन तरुणीचा मृतदेह सापडला होता. पिंपळगाव नजीक आहेर गावच्या पाण्याच्या पाटात दीपिका ताकाटे मृतावस्थेत आढळली होती. दीपिकाची हत्या झाली, तिचा अपघात झाला की तिने आत्महत्या केली, हा संशय होता.

तरुणी संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने संशय

दीपिकाच्या मानेवर गळा आवळल्याच्या खुणा असल्याने पोलिसांचा संशय बळावला. अखेर दीपिकाची हत्याच झाल्याचं आता उघडकीस आलं आहे. दीपिका ताकाटे कॉलेजला जात असल्याचं सांगून घराबाहेर पडली होती. मुलगी संध्याकाळ होऊनही घरी का आली नाही, याचा शोध कुटुंबीयांनी घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिचा मृतदेह पालखेडमधील डाव्या कालव्यात आढळून आला.

साथीदाराच्या मदतीने चुलतभावाकडून हत्या

चुलत भाऊ विक्रम ताकाटे यानेच दीपिकाची गळा आवळून हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. आपल्या साथीदाराची मदत घेऊन आरोपीने दीपिकाच्या ओढणीनेच तिचा गळा आवळून खून केल्याचं समोर आलं आहे. दीपिकाच्या हत्यचे नेमकं कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.

नाशिकच्या मित्राकडून नवी मुंबईत तरुणाची हत्या

दुसरीकडे, मैत्रिणीसोबत जवळीक वाढवणाऱ्या तरुणाची इर्षेतून हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. नवी मुंबईत घडलेल्या हत्याकांड प्रकरणी आरोपीला नाशिकमधून बेड्या ठोकण्यात आल्या. लॉकडाऊनच्या काळात दुरावा वाढल्यानंतर आरोपीने नाशिकहून येऊन तरुणाची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह घणसोली भागातील झाडीत टाकला होता. (Nashik College Girl Murder case solved Cousin killed)

बेपत्ता तरुणाचा शोध घेताना हत्येचा सुगावा

नवी मुंबईतील तळवली परिसरात राहणारा 19 वर्षांचा अनिल शिंदे पाच फेब्रुवारीला सकाळी बेपत्ता झाला होता. या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांनी त्याच्या फोनवरील शेवटचे लोकेशन शोधलं असता नाशकातील तरुणाची माहिती समोर आली.

पोलिसांनी 19 वर्षांच्या अनिकेत जाधवला नाशिकमधून ताब्यात घेतले. चौकशीसाठी त्याला पोलिस ठाण्यात आणले असता, त्याने अनिलची हत्या केल्याची कबुली दिली. त्याने दाखवलेल्या घटनास्थळावरुन अनिलचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला.

संबंधित बातम्या :

मैत्रिणीसोबत जवळीक वाढवल्याचा राग, नाशिकच्या मित्राकडून नवी मुंबईत तरुणाची हत्या

‘जीवनसाथी’वरुन ओळख, यूकेमध्ये MD असल्याची बतावणी, कल्याणच्या तरुणीला 16 लाखांचा गंडा

(Nashik College Girl Murder case solved Cousin killed)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.