AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

16 कृषी अधिकाऱ्यांच्या घोटाळ्याला नवे वळण; विभाग म्हणतो, प्रकरण निकाली, पण तक्रारदाराला माहितच नाही

नाशिकमध्ये 16 कृषी अधिकाऱ्यांनी तब्बल 147 शेतकऱ्यांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे एकीकडे राज्यभर खळबळ उडाली आहे.

16 कृषी अधिकाऱ्यांच्या घोटाळ्याला नवे वळण; विभाग म्हणतो, प्रकरण निकाली, पण तक्रारदाराला माहितच नाही
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 08, 2022 | 5:40 PM
Share

नाशिकः नाशिकमध्ये 16 कृषी अधिकाऱ्यांनी तब्बल 147 शेतकऱ्यांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे एकीकडे राज्यभर खळबळ उडाली आहे. सहा वर्षांत या अधिकाऱ्यांनी शासनाचीही सुमारे 50 कोटी 72 लाख 72 हजार 64 रुपयांची फसवणूक केल्याचे समजते. मात्र, आता हे प्रकरण 2018 मध्येच निकाली काढल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. त्यामुळे या घोटाळ्याला नवेच वळण मिळाले आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण निकाली काढल्याचे खुद्द तक्रारदारालाच काही माहिती नसल्याने गूढ वाढले आहे.

नेमके प्रकरण काय?

पेठ तालुक्यातील हेदपाड-एकदरे गावाचे शेतकरी योगेंद्र उर्फ योगेश सुरेश सापटे यांनी शासनाच्या विविध योजनांना मंजुरी मिळाल्याचे पाहिले. तशा निविदा निघाल्या. त्यांनी 2011 मध्ये अशा योजनेत कामे मिळावीत म्हणून अर्ज केला. त्यासाठी सापटे यांच्याकडून निविदा भरून घेतली. 100 रुपयांच्या कोऱ्या स्टँपपेपरवर तिकीट लालेल्या कोऱ्या 50 पावत्या तसे कोऱ्या चेकवर सह्या घेण्यात आल्या. या साऱ्याचा गैरवापर केला. सापटे यांना शेतीची कामे दिली. मात्र, त्यांच्या खात्यावरून 2011-2017 या काळात परस्पर 3 कोटी 17 लाख 4 हजार 504 रुपये काढून घेतले. अशाच प्रकारे इतर 147 शेतकऱ्यांना गंडवण्यात आले आहे. कृषी अधिकाऱ्यांनी एकीकडे शेतकऱ्यांना फसवले. दुसरीकडे शासनाच्या विविध योजनांचा निधी फस्त केला. याप्रकरणी शेतकरी सापडे यांनी पेठ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात दाद मागितली. तेव्हा न्यायालयाने हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

यांच्यावर गुन्हे दाखल

कृषी अधिकारी शीलानाथ पवार (रा. मानूर, ता. कळवरण), सरदारसिंग राजपूत (रा. चाळीसगाव, जि. जळगाव), एम. बी. महाजन (रा. ता. पेठ), अशोक घरटे (रा. सागुडे, जि. धुळे), विश्वनाथ पाटील (रा. परधाडे, जि. जळगाव) यांचा समावेश आहे. कृषी सहायकांमध्ये राधा सहारे (रा. कुकडणे, ता. सुरगाणा), प्रतिभा माघाडे (रा. दिंडोरी) यांचा समावेश आहे. कृषी पर्यवेक्षकांमध्ये किरण कडलग (रा. जवळे कडला, ता. संगमनेर), मुकुंद चौधरी (रा. उंबरी, ता. राहुरी), दिलीप वाघचौरे (रा. सोलापूर) यांचा समावेश आहे. अन्य संशयितांमध्ये दिलीप फुलपगार, दीपक कुसळकर, विठ्ठल रंधे, संजय पाटील, नरेश पवार, दगडू पाटील यांचा समावेश आहे. या साऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अन् असे नवे वळण

आता याप्रकरणी जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे म्हणतात की, या प्रकरणी 2018 मध्ये तक्रारदाराने लोकशाही दिनात तक्रार दाखल केली. चौकशीनंतर 2019 मध्ये ते निकाली काढले. गैरसमजातून तक्रार दाखल केल्याचे तक्रारदाराने लेखी लिहून दिले आहे. त्याची छायाचित्रेही आमच्याकडे आहेत. मात्र, तक्रादार योगेश सापटे यांनी आपण तक्रार केली होती. मात्र, कोरोना असल्यामुळे आपल्याला कार्यालयातच येऊ दिले नाही. सहा महिन्यानंतर गेल्यावर मला अर्ज निकाली काढल्याचे कळाले. यासंदर्भात मी विभागाकडे लेखी मागितले. मात्र, विभागाने काहीही दिले नसल्याचे म्हटले आहे.

इतर बातम्याः

Nashik|नाशिक जिल्ह्यात 72935 नागरिकांना मिळणार हक्काचं घर, काय आहे योजना?

Helmet Compulsory|विनाहेल्मेट प्रवेश दिल्याने प्राचार्य, मालमत्ता अधिकाऱ्यांवर गुन्हा; नाशिकमध्ये धडक कारवाई!

Fake promotions|महसूल अधिकाऱ्यांच्या बनावट पदोन्नत्या; प्रती 41 कार्यालये, मंत्र्यांना पाठवल्याने खळबळ

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.