AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री रोजगार योजनेंतर्गत वाहनांचे वाटप; काय आहे योजना, भुजबळांनी सांगितले महत्त्व!

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, गेले दोन वर्षे कोरोनाच्या काळात गेले असून अनेकांनी रोजगार देखील गमावला. त्यांना स्वयंम रोजगरातून उभी राहण्यासाठी ही महत्त्वाची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. लाभार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटी बाळगून व्यवसायात सातत्य ठेऊन प्रगती करावी.

मुख्यमंत्री रोजगार योजनेंतर्गत वाहनांचे वाटप; काय आहे योजना, भुजबळांनी सांगितले महत्त्व!
नाशिकमध्ये मुख्यमंत्री रोजगार योजनेंतर्गत बेरोजगाराना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी वाहनांचे वाटप केले.
| Updated on: Feb 27, 2022 | 4:40 PM
Share

नाशिकः महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्री रोजगार योजनेंतर्गत बेरोजगाराना स्वयंम रोजगार मिळवून देण्यासाठी आर्थिक साहाय्यातून वाहने वितरित करण्यात येत आहेत. लाभार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या संधीच सोन करून स्वयंम रोजगारातून प्रगती साधावी, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. नाशिक (Nashik) येथील कार्यालयात मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या (Chief Minister Employment Scheme) अंतर्गत वाहनांचे वितरण पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार जयवंतराव जाधव, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नानासाहेब महाले उपस्थित होते.

कशी आहे योजना?

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महाविकास आघाडीच्या वतीने राबविण्यात आलेला हा उपक्रम राज्यभरातील बेरोजगारांसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना साडेतीन लाखांपर्यंत सबसिडी देण्यात येत असून, महाराष्ट्र बँकेच्या माध्यमातून अल्पदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, गेले दोन वर्षे कोरोनाच्या काळात गेले असून अनेकांनी रोजगार देखील गमावला. त्यांना स्वयंम रोजगरातून उभी राहण्यासाठी ही महत्त्वाची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. लाभार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटी बाळगून व्यवसायात सातत्य ठेऊन प्रगती करावी, असे आवाहन करत लाभार्थ्यांना त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यांनी केले प्रयत्न

योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक प्रकाश घुगे, खादी ग्रामोद्योगचे व्यवस्थापक श्रीमती भामरे, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक गणेश झा, समन्वयक सचिन पवार यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला बाळासाहेब कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, नगरसेवक जगदीश पवार, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, पंचवटी विभागीय अध्यक्ष शंकर मोकळ, दत्ता पाटील, चिन्मय गाढे आदींसह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना साडेतीन लाखांपर्यंत सबसिडी देण्यात येत असून, महाराष्ट्र बँकेच्या माध्यमातून अल्पदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.

– छगन भुजबळ, पालकमंत्री

इतर बातम्याः

चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!

कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.