Nashik Election| प्रभागरचना 15 जानेवारीपर्यंत लांबणीवर; महापालिका निवडणूक पुढे ढकलणार?

Nashik Election| प्रभागरचना 15 जानेवारीपर्यंत लांबणीवर; महापालिका निवडणूक पुढे ढकलणार?
Nashik Municipal Corporation.

ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. हा आदेश ग्राह्य धरून निवडणूक आयोगाची तयारी सुरू आहे. याप्रकरणी आता 17 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Jan 05, 2022 | 10:54 AM

नाशिकः प्रचंड प्रमाणात वाढणारे कोरोना रुग्ण आणि राज्य निवडणूक आयोगाची सूचना यामुळे फेब्रुवारी महिन्यात होणारी महापालिका निवडणूक लांबणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिक महापालिकेसाठीच्या प्रभागरचनेबाबतची सांख्यिकी माहिती, विववरणपत्रे राज्य निवडणूक आयोगाने 6 जानेवारीपर्यंत सादर करण्यास सांगितले होते. मात्र, आता पुन्हा त्यात बदल करून 15 जानेवारीला ही माहिती मागवण्यात आली आहे. त्यानंतर पुढील सारी प्रक्रिया होणार आहे. त्यातच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. हा आदेश ग्राह्य धरून निवडणूक आयोगाची तयारी सुरू होती. त्यावर आता 17 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. हे सारे पाहता, निवडणुका पुढे ढकलल्या जातील का, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अशी झाली रचना

महापालिकेच्या 133 जागांसाठी 3 सदस्यीय पद्धतीने 44 प्रभागांच्या कच्च्या रचनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. नाशिकमध्ये सुरुवातीला म्हणजे 26 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभागरचनेसाठी कच्चा आराखड्याचे काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन सदस्यीय प्रभागरचना झाली. त्यानुसार या कामात पुन्हा बदल झाला. आता नगरसेवकांची संख्याही 122 वरून 133 वर नेण्यात आली. त्यामुळे या कामात पुन्हा बदल करावा लागला. पूर्वीच्या नियोजनानुसार साधरणतः 36 हजार लोकसंख्येचा एक प्रभाग होता. मात्र, नगरसेवकांची संख्या वाढल्यानंतर आता एका प्रभागाची लोकसंख्या 33 हजारांच्या घरात असेल. त्यामुळे कच्च्या प्रभारचनेचे काम पुन्हा करावे लागले. प्रभागरचना तयार करताना प्रत्येक प्रभागानुसार निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यात चर्चा झाली. त्यात चतुःसीमा, रस्ते, नदी-नाले याच्या नियमांचे पालन झाले आहे का, हे तपासण्यात आले. नाशिकमधील काही प्रभागांमध्ये ब्लॉक जुळवणीबाबतचे आक्षेप होते. ते सुद्धा ध्यानात घेतले. त्यानंतर प्रभागरचना अंतिम करण्यात आली. आता राज्य निवडणूक आयोग 15 जानेवारी रोजी या प्रभागरचनेला अंतिम रूप देणार आहे.

आयुक्तांकडे तक्रार

दुसरीकडे महापालिकेची प्रभागरचना फुटल्याचा दावा होत आहे. महापालिकेतील काही मातब्बर नगरसेवकांनी त्यासाठी खेळी केली असून, आपल्या सोयीनुसार वार्डांची रचना केली आहे आणि आपल्याला अडथळे ठरणाऱ्या स्वकीयांचे पत्ते कट करून त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे ही सारी चर्चा नगरसेवकांत सुरू आहे. सध्याच्या प्रभाग क्रमांक 11 मधील कामगारनगर हा परिसर महात्मानगरला जोडण्यात आल्याचे समजते. असे प्रकार इतर ठिकाणीही झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये संताप आहे. याप्रकरणी सातपूर येथील विभाग संघटक प्रशांत दैतकार-पाटील यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना पत्र दिले आहे. सोबतच न्यायालायत जाण्याचा इशारा दिला आहे.

इतर बातम्याः

Panchayat Election|नाशिकमध्ये 4 नगरपंचायतींच्या 11 जागांसाठी 38 उमेदवार रिंगणात

Nashik Corona|नाशिकरांसाठी पुढचे 5 दिवस धोक्याचे…राज्याच्या आरोग्य सचिवांचा काय आहे इशारा?

Nashik| लासलगावसह 16 गावांचा पाणीप्रश्न मार्गी; भुजबळांच्या प्रयत्नातून 17 कोटी 54 लाखांचा निधी मंजूर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें