VIDEO | आधी तो डुलायला लागला, नंतर नागोबाही डुलायला लागला, नंतर नंतर नागोबा चांगलाच चवताळला, वाचा सविस्तर!

नाशिकमधील मंगेश गायकवाड या तरुणाला मद्यपान केल्यानंतर नाग दिसला, आणि त्याने रस्त्यातच त्याच्याशी मस्ती सुरु केली (Nashik Lasalgaon Cobra Snake bytes)

VIDEO | आधी तो डुलायला लागला, नंतर नागोबाही डुलायला लागला, नंतर नंतर नागोबा चांगलाच चवताळला, वाचा सविस्तर!
लासलगावात तरुणाची नागाशी मस्ती


लासलगाव : मद्यधुंद अवस्थेत नागाशी मस्ती करणं नाशकातील तरुणाच्या चांगलंच अंगलट आलं आहे. नागाने चार वेळा चावा घेतल्यामुळे या तरुणाची प्रकृती चिंताजनक असून मृत्यूशी झुंज सुरु आहे. त्याच्यावर नाशिकमधील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नागासोबत मस्ती करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ समोर आला आहे. (Nashik Lasalgaon Youth manhandles Cobra Snake bytes Video Viral)

शाळेच्या आवारात नागाशी मस्ती

मद्यधुंद अवस्थेत आपण काय करतो याचे भान मद्यपान केल्यानंतर अनेकांना राहत नाही. अशीच एक घटना निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर गावात घडली आहे. मद्यपान केल्यानंतर मंगेश भाऊसाहेब गायकवाड या तरुणाने जिल्हा परिषद शाळेच्या आवारात नाग दिसताच त्याच्याशी मस्ती सुरु केली. यावेळी अनेक ग्रामस्थांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण हा तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याने कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हता.

अर्धनग्न अवस्थेतही नागाशी खेळ

मंगेश इतका नशेत होता की त्याने कमरेखालील पँट काढून फेकून दिली होती. यावेळी तो अर्धनग्न अवस्थेत होता. मस्ती करताना नागाने मंगेशला चार वेळा चावा घेतला. नाग चावल्याच्या रागात मंगेशने त्यालाच हाताने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. मंगेशचा नागाने चार वेळा चावा घेतल्याने मंगेशची प्रकृती चिंताजनक झाली असून तो मृत्यूशी झुंज देत आहे. निफाड येथे प्राथमिक उपचार करुन नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

पाहा व्हिडीओ :

वर्ध्यात घरात नाग शिरल्याने कुटुंबाची रात्र रस्त्यावर

वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात राहणारे कुटुंब जेवण आटपून झोपण्याच्या तयारीत होते. त्यावेळी घरात नागोबाचे दर्शन झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. शिवणफळ येथील मुरलीधर शेळके यांच्या घरात हा नाग शिरला होता. त्यामुळे सदस्यांची तारांबळ उडाली. घरात नागोबाच्या दहशतीने कुटुंबाला रात्र घराबाहेर रस्त्यावर काढावी लागली होती. शेवटी मोहंगाव येथील सर्पमित्रांशी संपर्क साधत त्यांना बोलावण्यात आले. तब्बल आठ तासांनंतर सर्पमित्राच्या मदतीने या नागोबाच्या दहशतीतून कुटुंबीयांची मुक्तता झाली. सर्पमित्रांनी नागाला पकडून जंगलात सोडले.

संबंधित बातम्या :

VIDEO | सांगलीतील शिराळात चालत्या दुचाकीत नाग आढळला

VIDEO | झोपायच्या तयारीत असताना कुटुंबाला नागोबाचं दर्शन, रात्र घराबाहेर काढण्याची वेळ

(Nashik Lasalgaon Youth manhandles Cobra Snake bytes Video Viral)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI