AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकसह 18 महापालिकांची निवडणूक कधी; आज-उद्या मिळणार उत्तर, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने विधिमंडळात विशेष कायदा संमत करून या महापालिकांसाठी तयार केलेली प्रभागरचना रद्द केली आहे. शिवाय नव्याने प्रक्रिया करण्याचे अधिकार स्वतःकडे घेतलेत. सरकारच्या या निर्णयाविरोधात अनेकांनी आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेत. या प्रकरणी आज गुरुवारी राज्य सरकार प्रतिज्ञापत्राद्वारे आपले म्हणणे न्यायालयात मांडण्याची शक्यता आहे. या सुनावणीत काय निर्णय होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

नाशिकसह 18 महापालिकांची निवडणूक कधी; आज-उद्या मिळणार उत्तर, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
नाशिक महापालिकेचे बोधचिन्ह.
| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 5:16 PM
Share

नाशिकः नाशिकसह (Nashik) मुंबई, नवी मुंबई, वसई – विरार, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी – चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, अमरावती, अकोला, नागपूर या रखडलेल्या 18 महापालिकांची (municipal corporation) निवडणूक (election) कधी होणार याचे उत्तर आज गुरुवार ( 7 एप्रिल) आणि उद्या शुक्रवारी (8 एप्रिल) मिळण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणी दाखल असलेल्या जवळपास सात ते आठ याचिकेवर या दोन दिवसांत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सध्या ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने विधिमंडळात विशेष कायदा संमत करून या महापालिकांसाठी तयार केलेली प्रभागरचना रद्द केली आहे. शिवाय नव्याने प्रक्रिया करण्याचे अधिकार स्वतःकडे घेतलेत. सरकारच्या या निर्णयाविरोधात अनेकांनी आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेत. या प्रकरणी आज गुरुवारी राज्य सरकार प्रतिज्ञापत्राद्वारे आपले म्हणणे न्यायालयात मांडण्याची शक्यता आहे. या सुनावणीत काय निर्णय होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. हा निकाल सरकारविरोधात गेला, तर मे महिन्यात महापालिकांच्या निवडणुका होऊ शकतील, असा अंदाज आहे.

सध्या स्थिती काय?

नाशिक महापालिकेची निवडणूक विहित वेळेच्या आत होत नसल्याने नगरविकास विभागाने प्रशासकाची नियुक्ती केलीय. त्यानुसार 14 मार्चपासून प्रशासक म्हणून महापालिका आयुक्तांनी कारभार हाती घेतलाय. विद्यमान महापौर आणि उपमहापौरांची मुदत 15 मार्च रोजी संपलीय. सध्या प्रभाग रचनेच्या हरकती आणि आक्षेपावर सुनावणी पूर्ण झाली आहे. या सुनावणीचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले आहे. मात्र, राज्य सरकारने प्रभागरचना रद्द करून नव्याने प्रक्रिया करण्याचे अधिकार स्वतःकडे घेतल्याने पुढील प्रक्रिया ठप्प आहे.

कशी झालीय प्रभागरचना?

महापालिकेच्या 133 जागांसाठी 3 सदस्यीय पद्धतीने 44 प्रभागांच्या कच्च्या रचनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. नाशिकमध्ये सुरुवातीला म्हणजे 26 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभाग रचनेसाठी कच्चा आराखड्याचे काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन सदस्यीय प्रभाग रचना झाली. त्यानुसार या कामात पुन्हा बदल झाला. नगरसेवकांची संख्याही 122 वरून 133 वर नेण्यात आली. त्यामुळे या कामात पुन्हा बदल करावा लागला. पूर्वीच्या नियोजनानुसार साधरणतः 36 हजार लोकसंख्येचा एक प्रभाग होता. मात्र, नगरसेवकांची संख्या वाढल्यानंतर आता एका प्रभागाची लोकसंख्या 33 हजारांच्या घरात असेल. त्यामुळे कच्च्या प्रभाग रचनेचे काम पुन्हा करावे लागले.

काय होऊ शकते?

सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिलासा देणारा निर्णय घेतला, तर अंतिम झालेली नाशिक महापालिकेची प्रभागरचना तातडीने जाहीर केली जाईल. त्यानंतर ओबीसी आरक्षण वगळून सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गासाठी आरक्षण काढण्यात येईल. त्यानंतर 44 प्रभागांतील किती जागा स्त्री, पुरुष यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर सूचना आणि हरकती मागवून साधरणतः एप्रिलच्या शेवटी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. असे घडलेच तर मे अखेरीस मतदान होऊ शकते.

पक्षीय बलाबल कसे?

– भाजप – 66 (एका नगरसेवकाचे निधन. सध्या 64)

– शिवसेना – 35 (सध्या 33)

– राष्ट्रवादी – 6

– काँग्रेस – 6

– मनसे – 5

– अपक्ष – 4

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.