नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात, 15 हजारांच्या सानुग्रह अनुदानावर महासभेत शिक्कामोर्तब

नाशिक महापालिकेच्या महासभेत अखेर कर्मचाऱ्यांना 15 हजारांचे सानुग्रह अनुदान देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात, 15 हजारांच्या सानुग्रह अनुदानावर महासभेत शिक्कामोर्तब
नाशिक महापालिका.


नाशिकः नाशिक महापालिकेच्या महासभेत अखेर कर्मचाऱ्यांना 15 हजारांचे सानुग्रह अनुदान देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

नाशिक महापालिकेत जवळपास पाच हजार कर्मचारी आहेत. त्यांना जास्तीत जास्त पस्तीस हजार रुपयांचा बोनस मिळावा अशी मागणी साऱ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. मात्र, एकीकडे आधीच महापालिका आर्थिक संकटात आहे. ते पाहता या कर्मचाऱ्यांना पंधरा हजारांचा सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली होती. त्यानुसार मंगळवारी झालेल्या महासभेत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिका आस्थापनेवरील गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील कर्मचाऱ्यांत अंगणवाडी सेविका, मदतनीस, सफाई कामगार यांना हे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. गट ‘क’ मधील सातव्या वेतन आयोगाच्या लेव्हल – 15 आणि त्यापेक्षा कमी वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना या सानुग्रह अनुदान लाभ मिळेल. सोबतच ज्या कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतनमधील बँडमधील वेतनश्रेणी ही 9300-34,800 व ग्रेड पे 4400 रुपयांपेक्षा कमी वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही हे अनुदान मिळेल. गेल्या वर्षीच्या दिवाळीनंतर मानधनावर कार्यरत असणारे अंगणवाडी कर्मचारी, मानधनावर सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ कार्यरत असणारे कर्मचारी यांनाही सानुग्रह अनुदान मिळेल. त्यात कोरोना काळात जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना साडेसात हजार रुपये मानधन आणि शासन अनुदानातून मानधन वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही साडेसात हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे.

निफाडमध्ये आशा सेविकांचे पगार थकले

निफाड तालुक्यातील आशा सेविकांचे गेल्या पाच महिन्यांपासून पगार नाहीत. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. निफाड तालुक्यातील आशा सेविका कोरोना काळामध्ये आपली सेवा बजावत आहेत. मात्र, ऐन दिवाळीच्या तोंडावर निफाड पंचायत समिती आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या 370 आशा सेविका आणि 18 सुपरवायझर यांचा पगार गेल्या पाच महिन्यांपासून थकला आहे. त्यामुळे दिवाळी सण कसा साजरा करायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. दरम्यान, आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या पगारास तालुका व जिल्हा निधी शिल्लक नसल्याने उशीर झाला आहे. पैसे येताच पगार करू, असे आश्वासन निफाडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांनी दिले आहे.

इतर बातम्याः

NashikGold: सोन्याच्या दराचे रॉकेट दिवाळीआधीच सनाट, महिन्यात हजाराची वाढ!

नाशिककरांचं अनोखं पर्यावरण प्रेमः 100 झाडांनी बहरलेल्या उद्यानाचा जंगी वाढदिवस साजरा!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI