Nashik | पटोलेंच्या मोदींविरोधी वक्तव्याचा निषेध; नाशिकमध्ये भाजपचे जोरदार आंदोलन

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याचा निषेध करत मंगळवारी नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले.

Nashik | पटोलेंच्या मोदींविरोधी वक्तव्याचा निषेध; नाशिकमध्ये भाजपचे जोरदार आंदोलन
नाशिकमधील सातपूर भागात भाजप कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्याविरोधात आंदोलन केले.
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 2:43 PM

नाशिकः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपने राज्यभर आंदोलन पेटवले असून, नाशिकमध्येही जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला. सातपूर परिसरात नाना पटोलेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पटोलेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या अटकेची मागणी केली.

नेमके प्रकरण काय?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. पटोले म्हणतात की, “मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षांपासून राजकारणात आहे. लोक पाच वर्षांत आपल्या एका पिढीचा उद्धार करून टाकतात. शाळा, कॉलेज हे करून आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करून टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारू शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे…” असे आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला आणि ऐकायला मिळत आहे. त्यामुळे भाजपने नाना पटोले यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन सुरू केले आहे.

पटोलेंना अटक करा

पटोले यांच्या वक्तव्याचा निषेध करत मंगळवारी नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. शहरातील सातपूर परिसरात नाना पटोलेंच्या फोटोला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. ‘द्या टोले, नाना पटोले’ अशी घोषणाबाजी करत नाना पटोलेंना त्वरित अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, तिकडे अमरावतीमध्ये भाजप नेते अनिल बोंडे यांनी नाना पटोलेंवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कुत्र्यासारखं भुंकायची स्पर्धा लागली आहे. नाना पटोलेंना मी सांगून ठेवतो, तुम्ही म्हणता मोदींना मारू शकतो. तर, तुमचा पंजा छाटला जाईल. नाना पटोलेंनी गमजा करू नये. काँग्रेस नेत्यांना मोदींजींच्या नखाची सर तरी येते का? पालकमंत्री छप्पन इंच छाती म्हणतात. विधानसभेत नकला करतात. काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष नरेंद्र मोदींना मारू शकतो असं म्हणत असेल तर त्या कुत्र्याला दांडकं मारायला काय हरकत आहे. नारायण राणेंना अटक करतात. नितेश राणेंवर कारवाई करतात. नाना पटोले बोलल्यावर कुठं गेली पोलीस, कुठं गेले गृहमंत्री, असा सवाल अनिल बोंडे यांनी केलाय.

इतर बातम्याः

Nashik | नाशिकमध्ये कोरोना मृत्यूंची आकडेवारी लपवली का; बळींच्या रेकॉर्डमध्ये पावणेतीन हजारांची भर कशी?

Nashik | आजपासून कडक हेल्मेटसक्ती; पहिल्यांदा पाचशेचा दंड, दुसऱ्यांदा खोड मोडणारी कारवाई होणार

महाराष्ट्र पक्षीमित्र संघटेला 40 वर्षे पूर्ण; आजवर 64 संमेलनांचे आयोजन, पर्यावरण चळवळीच्या अनोख्या कार्याला उजाळा…!

Non Stop LIVE Update
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....