AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : अजब-गजब, नाशिकमध्ये कोरोना लस घेतल्यानंतर दंडाला लोखंड, स्टील चिटकलं

सोनार यांच्या मुलाने युट्युबवर दिल्लीच्या एका माणसाचा नाणी चिकटतात, असा एक व्हिडिओ बघितला. कोरोना लसीचं दोन लस घेतलेल्या वडिलांच्या अंगाला स्टील लोखंड,नाणं चिकटवून बघितलं तर अगदी सहज चिटकल. (Nashik Coin Attached body)

VIDEO : अजब-गजब, नाशिकमध्ये कोरोना लस घेतल्यानंतर दंडाला लोखंड, स्टील चिटकलं
रवींद्र सोनार
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 2:38 PM
Share

नाशिक: नाशिकमध्ये एक अजब प्रकार समोर आलाय. 72 वर्षीय अरविंद सोनार यांनी 8 दिवसांपूर्वी कोरोनाच्या लसीचा डोस घेतला होता. मात्र, आता त्यांच्या अंगाला लोखंड, स्टीलच्या वस्तू तसेच नाणी  अंगाला चिटकत आहेत.त्यामुळे सोनार हे चांगलेच चर्चेत आलेत.या घटनेचा मात्र त्यांना काहीही त्रास होत नाहीये,अस त्यांचं मत आहे. तर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं याबाबत घाबरुन जाण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. (Nashik Aravind Sonar taking corona vaccine after eight days steel coin attach with his body)

हा प्रकार कसा समोर आला

अरविंद सोनार यांनी 8 दिवसांपूर्वी लस घेतली होती. सोनार यांच्या मुलाने युट्युबवर दिल्लीच्या एका माणसाचा नाणी चिकटतात, असा एक व्हिडिओ बघितला. जयंत सोनार यानं कोरोना लसीचं दोन लस घेतलेल्या वडिलांच्या अंगाला स्टील लोखंड,नाणं चिकटवून बघितलं तर अगदी सहज चिटकल. रवींद्र सोनार यांनी सुरुवातीला घामामुळे असा प्रकार होत असावा म्हणून अंघोळ करुन पाहिलं.  अंघोळ केल्यानंतर पुन्हा एकदा नाणी आणि चमचे शरीरावर चिकटतात की नाही हे तपासलं. यावेळी पुन्हा एकदा नाणी चिकटली.

जयंत सोनार यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला. तो व्हिडीओ दिल्लीमधील होता. संबंधित व्हिडीओमध्ये कोरोना लसीचे डोस घेतलेल्या व्यक्तीच्या अंगाला नाणे आणि इतर स्टीलच्या गोष्टी चिकटत असल्याचं बघितलं होतं. त्यामुळे त्यांनी व्हिडीओतील घटनेप्रमाणं नाणी वडिलांच्या अंगाला चिकटत असल्याचं समोर आलं आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं मत काय?

नाशिकच्या या घटनेची सर्वत्र चर्चा सुरु आहे. मात्र, ही घटना अंधश्रद्धेशी संबंधित नाही. यापूर्वी अनेक घटना अशा समोर आल्यात त्यामुळे घाबरून न जाता यावर तज्ज्ञ मंडळीने संशोधन करणं गरजेचं आहे, अशी माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समिती नाशिकचे कृष्णा चांदगुडे यांनी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या:

वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, गोड माणूस चंद्रकांतदादांना शुभेच्छा : संजय राऊत

नाशिकमधील 1184 वाडे धोकादायक, पावसाळ्यापूर्वी वाडे रिकामे करण्याचा आदेश

(Nashik Aravind Sonar taking corona vaccine after eight days steel coin attach with his body)

टीप: कोरोनाची लस सुरक्षित आहे. या लसींना WHO आणि ICMR कडून परवानगी मिळाल्यानंतरच तिच्या वापराला सुरुवात झाली आहे. नाशिकच्या घटनेंसंदर्भात कोरोना लसीसंदर्भात करण्यात आलेल्या दाव्याची पुष्टी टीव्ही 9 मराठी करत नाही. कोरोना लसीकरण करुन घ्यावं.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.