AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दरवाजा सतत बंद, एक वयस्कर व्यक्ती यायचा अन्… निदा खान ज्या घरात लपली होती, तिथे नेमकं काय घडायचं?

नाशिक TCS कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. कौसर पार्क परिसरात ती लपून बसली होती.

दरवाजा सतत बंद, एक वयस्कर व्यक्ती यायचा  अन्... निदा खान ज्या घरात लपली होती, तिथे नेमकं काय घडायचं?
nida khan
| Updated on: May 08, 2026 | 12:47 PM
Share

नाशिकमधील टीसीएस (TCS) कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, सक्तीचे धर्मांतर आणि विनयभंग प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आणि अनेक दिवसांपासून फरार असलेली महिला आरोपी निदा खानला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नाशिक गुन्हे शाखा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला छत्रपती संभाजीनगरच्या कौसर पार्क परिसरातून ताब्यात घेतले. यानंतर आता निदा खान ज्या घरात लपली होती, त्या परिसरातील नागरिकांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

कौसर पार्कमध्ये लपून बसली होती निदा खान

मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान ही छत्रपती संभाजीनगरमधील कौसर पार्क परिसरात नाव बदलून, अत्यंत गुप्तपणे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यामुळे पोलिसांनी सापळा रचून काल रात्री तिला ताब्यात घेतले. त्यानंतर नाशिकमध्ये आणून तिच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या कारवाईमुळे एसआयटीच्या (SIT) तपासाला आता मोठी गती मिळण्याची शक्यता आहे.

आता निदा खान ज्या ठिकाणी राहत होती, त्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. निदा खान ही कौसर पार्कमधील ज्या घरात राहत होती. त्या परिसरात भाडेकरुंची संख्या जास्त आहे. तसेच या ठिकाणी राहणारे लोक एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करत नाही. यामुळेच तिला या ठिकाणी राहणं सोपं झालं.

या परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे घर गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून रिकामे होते. मूळ मालकाने ते घर विकल्यानंतर तिथे नक्की कोण राहायला आले, याची कोणालाही कल्पना नव्हती. आम्ही अनेकदा फक्त एका वयस्कर व्यक्तीला या घरातून बाहेर ये-जा करताना पाहिले होते. तो माणूस हातात दूध किंवा किराणा सामान घेऊन येताना दिसायचा. पण घरात निदा खान लपलेली आहे, याचा आम्हाला पुसटसा अंदाजही आला नाही, असे परिसरातील नागरिकांनी सांगितल. हे लोक गेल्या ४ ते ५ दिवसांपूर्वीच या ठिकाणी राहायला आले असावेत. ते दिवसा आले की रात्री, याबद्दल कोणालाही समजले नाही, असेही स्थानिक रहिवाशांनी म्हटलेत.

नेमकं प्रकरण काय?

नाशिकच्या टीसीएस कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे शोषण करणे, त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करणे, धार्मिक भावना दुखावून त्यांचा विनयभंग करणे अशा गंभीर आरोपांखाली आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे सरकारने याची चौकशी एसआयटी (SIT) कडे सोपवली आहे. निदा खानच्या अटकेमुळे या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात गुंतलेले आहेत, हे लवकरच समोर येणार आहे.

Follow Us
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.
राजभवनात भाजपचे एजंट बसलेत; राऊतांचा भाजप आणि राज्यपालांवर हल्लाबोल
राजभवनात भाजपचे एजंट बसलेत; राऊतांचा भाजप आणि राज्यपालांवर हल्लाबोल.
निदा खान फक्त मोहरा, महाराष्ट्रभर मोठं जाळं कार्यरत?
निदा खान फक्त मोहरा, महाराष्ट्रभर मोठं जाळं कार्यरत?.
मोठी दुर्घटना टळली! वादळात अडकलं एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर.....
मोठी दुर्घटना टळली! वादळात अडकलं एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर......
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार.
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा...
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा....
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले...
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले....
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच...
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच....
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका.