AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aaditya Thackeray : खड्ड्यांमुळे पाण्याच्या बॉटलला माईक बनवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी धावून गेले आदित्य ठाकरे, ‘तुम्हाला अजून काय पाहिजे मला सांगा’

Aaditya Thackeray : "आम्ही प्रशासनाला आवाहन करत आहोत. इथल्या मुलांनी व्हिडीओ बनवला. देशात विद्यार्थी मोहीम राबवत आहेत. आम्ही येणार म्हणून काल रात्री रस्त्यावरील खड्डे बुजवले"

Aaditya Thackeray : खड्ड्यांमुळे पाण्याच्या बॉटलला माईक बनवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी धावून गेले आदित्य ठाकरे, 'तुम्हाला अजून काय पाहिजे मला सांगा'
Aaditya Thackeray
| Updated on: Aug 13, 2026 | 2:14 PM
Share

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर पेगलवाडी येथील शाळकरी विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या मुलांनी पाण्याच्या बाटलीचा माईक करुन खड्ड्यांवर उपरोधिकपणे रिपोर्टिंग केलं होतं. रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल ही मुलं बोलली होती. आता आदित्य ठाकरे त्या स्पॉटवर पोहोचले आहेत. त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. रस्त्यांच्या दुरावस्थेचा जो व्हिडिओ व्हायरल झाला तिथे आदित्य ठाकरे गेले. आदित्य ठाकरे त्र्यंबकेश्वरच्या पेगलवाडी मध्ये पोहचले आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांशी आदित्य ठाकरे यांनी साधला संवाद. ज्या शाळकरी विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओ बनवला त्यांच्यासह इतर विद्यार्थ्यांसोबत आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला. ‘तुम्हाला अजून काय पाहिजे मला सांगा मी तुम्हाला मदत करतो’ कोणाला काय बनायचे यासह विद्यार्थ्यांचे व्हिजन आदित्य ठाकरे यांनी जाणून घेतले.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी येथील रस्त्याची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह आमदार हिरामण खोसकर यांनी केली पेगलवाडी रस्त्याची पाहणी. प्रशासनाला तत्काळ रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या. पेगलवाडी येथील शाळकरी विद्यार्थ्यांनी बाटलीचा माईक हाती घेत रस्त्याच्या दुरुस्तीची मांडली होती व्यथा. बांधकाम विभागाने पेगलवाडी रस्त्याची दुरुस्ती करण्यास सुरुवात केली. आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पेगलवाडी रस्त्याची पाहणी करणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच प्रशासनाने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले.

हातातल्या छत्रीला माईक बनवलेलं

मागच्या आठवड्यात रायगडच्या कोंदिवडे गावातील विद्यार्थिनींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांनी सुद्धा अशाच प्रकारे रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल भाष्य केलं होतं. फरक इतकाच होता की, त्या मुलींनी पाण्याच्या बाटलीऐवजी हातातल्या छत्रीला माईक बनवलं होतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून Gen Alpha पिढी एक वेगळ्या पद्धतीने आपले विषय सरकारसमोर मांडत आहे.

इथल्या मुलांनी व्हिडीओ बनवला

“आम्ही प्रशासनाला आवाहन करत आहोत. इथल्या मुलांनी व्हिडीओ बनवला. देशात विद्यार्थी मोहीम राबवत आहेत. आम्ही येणार म्हणून काल रात्री रस्त्यावरील खड्डे बुजवले. गावाच्या मागच्या बाजूनेच प्रशासन अंधारात निघून गेले. शाळेत वर्ग खोली नाही, बाथरूम नाही. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे हाल आहेत” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

शिक्षण मंत्र्यांचे लक्ष शिक्षणावर नाही

“दोन वर्षांपूर्वी हा रस्ता बनवला होता. काल केलेला रस्ता दिसत नाही. शिक्षण मंत्र्यांचे लक्ष शिक्षणावर नाही. एखादा राजकीय दौरा लागल्यावर धावपळ होते. मला राजकारण आणायचे नाही. विद्यार्थ्यांचे अभिनंदन करायचे आहे” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Follow Us
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी: धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
भावेश कावरेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून राज्यात संताप: मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
नीट परीक्षा आणि तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार