Video : नादुरुस्त ट्रकला अचानक आग, रस्त्यावर ट्रक उभा असल्याने आग लावल्याचा संशय

आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत टोल नाक्याजवळील साकोरे फाट्यावर नादुरुस्त ट्रकला गुरुवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. (Nashik Truck Catch Fire on mumbai Agra highway)

Video : नादुरुस्त ट्रकला अचानक आग, रस्त्यावर ट्रक उभा असल्याने आग लावल्याचा संशय
मुंबई आग्रा महामार्गावर उभ्या ट्कला भीषण आग


नाशिक : आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत टोल नाक्याजवळील साकोरे फाट्यावर नादुरुस्त ट्रकला गुरुवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. अचानक लागलेल्या आगीत पूर्ण ट्रक जळून खाक झाला. मात्र ही आग लागली नसून लावल्याचा संशय व्यक्त केला जातोय. (Nashik Truck Catch Fire on mumbai Agra highway)

मुंबई-आग्रा महामार्गावरील रस्त्यावर उभ्या नादुरुस्त ट्रकला आग

निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्या जवळील कोकणगाव येथील साकोरे फाट्यावर नाशिकच्या दिशेने पुठ्ठे घेऊन जाणारा ट्रक गुरुवारी सकाळी नादुरुस्त झाला होता त्यामुळे पुठ्याने भरलेला ट्रक मुंबई-आग्रा महामार्गावरील रस्त्यावर उभा होता. मात्र गुरुवारी रात्री उशिरा अकरा वाजेच्या सुमारास अचानक ट्रकला आग लागली ही आग हळूहळू इतकी भीषण झाली की ट्रक मधील संपूर्ण भरलेला पुठ्ठा व ट्रक जळून खाक झाल्याची घटना घडली.

आग विझविण्यासाठी पिंपळगाव बसवंत येथील अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर ही आग इतकी भीषण होती की एक तास उलटून गेल्यानंतर ही आग आटोक्यात आली नाही या आगीत संपूर्ण ट्रक व पुठ्ठा जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.

आग लागली की लावली?

यावेळी मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिककडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आल्याने महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आगीचे कारण जरी अस्पष्ट असेल मात्र कोणीतरी रस्त्यावर ट्रक उभा असल्याने मुदामून आग लावल्याचे बोलले जात आहे. (Nashik Truck Catch Fire on Agra highway)

पाहा व्हिडीओ :

हे ही वाचा :

महाराष्ट्राचा इथेनॉलनिर्मितीमध्ये देशात झेंडा, 1012 लाख टन ऊसाचं गाळप पूर्ण, साखर आयुक्तांची माहिती

अन् पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश पत्रकारांवर भडकले!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI