हिंदू मुलांबरोबर लग्न केल्यास… मुस्लिम मुलींसाठी हिंदू हुंकार सभेतून 10 ऑफर; काय आहेत या ऑफर?

सिन्नरच्या एमआयडीसीत बांगलादेशी घुसखोर आहे, जमात ए इस्लाम ही संघटना यामागे काम करत आहे. नाशिक जिल्ह्यात बांगलादेशी हटाव मोहीम हाती घेतली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

हिंदू मुलांबरोबर लग्न केल्यास... मुस्लिम मुलींसाठी हिंदू हुंकार सभेतून 10 ऑफर; काय आहेत या ऑफर?
Hindu Hunkar SabhaImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 8:42 AM

चैतन्य गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक : नाशिकमध्ये पार पडलेल्या हिंदू हुंकार सभेतून थेट मुस्लिम मुलींनाच साद घालण्यात आली आहे. या मुलींना थेट हिंदू मुलांसोबत लग्न करण्याची ऑफर देण्यात आली आहे. तसेच हिंदू मुलांबरोबर लग्न केल्यास त्याचे काय फायदे होणार याची माहितीही देण्यात आली आहे. या सभेतून एकूण 10 ऑफर मुस्लिम मुलींना देण्यात आल्या असून या ऑफरची सध्या चर्चा रंगली आहे. हिंदू हुंकार सभेतून देण्यात आलेल्या या ऑफरवर मुस्लिम समुदायातून अजून काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे मुस्लिम समुदायाच्या प्रतिक्रियांकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील ईदगाह मैदानावर काल हिंदू हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत साधूसंत आणि शेकडोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. सुरेशजी चव्हाणके हे या सभेचे प्रमुख वक्त होते.व्यासपीठावर महामंडलेश्वर शांतिगिरीजी महाराज, भक्तीचरणदास महाराज, गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्यासह इतर साधूसंत देखील उपस्थित होते. यावेळी मुस्लिम मुलींना या दहा ऑफर करण्यात आल्या. तसेच नाशिकमध्ये गेल्यावर्षभरात 500 हून अधिक हिंदू तरुणी लव्ह जिहादच्या बळी पडल्याचा धक्कादायक दावाही करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

मुस्लिम मुलींसाठीच्या 10 ऑफर

1. मुस्लिम मुलीने हिंदू मुलाबरोबर लग्न केले तर तिला तीन तीन सवत ठेवाव्या लागणार नाहीत

2. मुलं जन्माला आल्यानंतर काटछाट करावी लागणार नाही

3. तुम्हाला मुलं जन्म घालण्याची मशीन बनवले जाणार नाही

4. लव्ह जिहादचे समर्थन करणाऱ्या लोकांच्या दुकानातून एक दाणा देखील घ्यायचा नाही

5. तुम्हाला 48 डिग्री तापमानात बुरखा घालावा लागणार नाही

6. संपत्तीत अर्धा वाटा मिळेल

7. तीन तलाक म्हणत कुणीही तलाक देणार नाही

8. तिला पुनर्जन्माची हमी मिळेल

9. सात जन्मापर्यंत साथ देता येईल

10. मेल्यानंतर कयामत के दिन तक कबरमध्ये राहावे लागणार नाही

500 मुली लव्ह जिहादच्या बळी

दरम्यान, यावेळी सुरेश चव्हाणके यांनी खळबळजनक दावा केला आहे. नाशिकमध्ये एका वर्षात 500 पेक्षा जास्त मुली लव्ह जिहादच्या बळी ठरल्या आहेत. हा आकडा तर सरकारी आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक लव्ह जिहाद बीडमध्ये होतात. त्यानंतर नाशिकचा नंबर लागतो. आजूबाजूच्या बांडगुळामध्ये हिरवा रावण लपला आहे. माझ्यावर 1825 एफआयआर आहेत. भगवा झेंडा हातात घेऊन मिनी पाकिस्तानमध्ये घुसल्यामुळे माझ्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, असं सुरेश चव्हाणके म्हणाले.

तुम्ही शांत बसणार का?

गांधींजींचे तीन माकडे माकड लोकांसाठीच ठीक आहे. माकडासारखे तोंड, डोळे, कान बंद करून बसणार का? तुमच्या बहिणीकडे कुणी वाकड्या नजरेने बघितलं तर शांत बसणार का? पोलिस हे देखील जिहादवाल्यांचे व्हिक्टिम आहेत. पण पोलिसांच्या पाठीमागे हिंदू समाज आहे. नाशिकरोड येथे सोमाणी गार्डन जवळ छोटं थडगे होतं, तिथे मोठी मस्जिद होत आहे. विहितगाव येथे हिंदूंची संख्या 50 टक्क्याने कमी होत आहे. विहितगाव आता ईदगाव होत आहे, असा दावा चव्हाणके यांनी केला.

जशास तसे उत्तर द्या

भगूर या गावी वसूबारस दिवशी गायी कापून आणून टाकल्या. ती गाय कापणाऱ्याचे हात कापल्याशिवाय गाय शांत बसणार नाही. या हुंकार सभेचा हेतू आहे की, आमच्या बहिणीकडे वाईट नजरेने पाहणाऱ्याला तसेच उत्तर दिले पाहिजे. मी नाशिकच्या प्रसिद्ध नवश्या गणपती येथे जाणार आहे. येथील लँड जिहादचे अतिक्रमण हटवले पाहिजे. मी एकनाथ शिंदे यांना बुलडोझर भेट देऊन योगी जसे करतात, तसे करण्याची मागणी करेन, असंही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.