तुम्हाला अल्झायमर, न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्या; चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका

उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरूनही भाजपवर टीका केली होती. त्यावरही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. 30 वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता मिळवून मुंबईची ज्यांनी लूट केली.

तुम्हाला अल्झायमर, न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्या; चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 27, 2023 | 10:26 AM

नाशिक | 27 जुलै 2023 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली. शिवसेनाप्रमुखांनी तुम्हा दोघांना वाचवलं. त्याचे पांग तुम्ही फेडत आहात काय? तुम्ही मला संपवायला निघाला आहात. मला संपवूनच दाखवा, असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि शाह यांना दिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांना अल्झायमर झाला आहे. त्यांनी न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्यावेत, अशी खोचक टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यानंतर ट्विट करूनही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवलं. अडीच वर्षांत अडीच दिवसही ज्यांना मंत्रालयात जावं वाटलं नाही. ते उद्धव ठाकरे मोदीजींनी नऊ वर्षांत काय केलं? असा प्रश्न विचारत आहेत.

बहुधा तुम्हाला अल्झायमरचा आजार झाला आहे. कारण 2019 च्या निवडणुकीत मोदीजींच्या कर्तृत्वावर तुम्ही शेकडो भाषणं केली आणि जिंकून आलात. जरा चांगल्या न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्या. म्हणजे मोदींवर केलेली भाषणं तुम्हाला आठवतील, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

जनता तुम्हाला घरी बसवेल

महायुतीच्या जागा वाटपाची चिंता तुम्ही करू नका. तुमची शिल्लक सेना तरी निवडणुकीपर्यंत तुमच्यासोबत राहते का? त्याकडे लक्ष द्या. आत्मनिर्भर भारतासाठी महायुती झाली आहे. तर तुमची महाविकास आघाडी सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी झाली. तुमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी 5 दावेदार बाशिंग बांधून बसले आहेत. त्यात तुम्हीही बोहल्यावर बसण्यासाठी उत्सुक आहात. पण 2024 साली जनता तुम्हाला तुमच्या आवडीचं घरी बसण्याचं काम देणार आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

मुंबई तोडणार नाही

उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरूनही भाजपवर टीका केली होती. त्यावरही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. 30 वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता मिळवून मुंबईची ज्यांनी लूट केली आणि मुंबईतील मराठी माणसाला विकासापासून दूर ठेवलं. ते उद्धव ठाकरे आज मुंबईची चिंता करत आहेत. मुंबईवरील तुमचं बेगडी प्रेम ऊतू जात आहे. मुंबई तोडणार असं सांगून तुम्ही मुंबईकरांची दिशाभूल करत आहात. मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडणार नाही. पण येत्या निवडणुकीत तुमच्या भ्रष्ट कारभारातून मात्र मुंबई नक्की मुक्त होईल, असंही बावनकुळे यांनी ठणकावलं.

Non Stop LIVE Update
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, कशेडी बोगद्यातून तुम्ही प्रवास करताय?
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, कशेडी बोगद्यातून तुम्ही प्रवास करताय?.
शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी थेट लढत, शिंदेंनी कुणाला दिली संधी?
शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी थेट लढत, शिंदेंनी कुणाला दिली संधी?.
चिन्ह वेगळं, नावात साम्य, तुतारीवरून संभ्रम? कोल्हेंचा हल्लाबोल काय?
चिन्ह वेगळं, नावात साम्य, तुतारीवरून संभ्रम? कोल्हेंचा हल्लाबोल काय?.