नाशिक : दिंडोरी तालुक्यातील महाजे ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडीवेळी मोठा राडा झाला. येथे सरपंचपदाच्या निवडीवेळी ग्रामपंचायत सदस्यांची पळवापळवी करण्यात आली. या प्रकारामुळे येथे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. हा राडा एवढा गंभीर होता की, यामध्ये नागरिकांवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत काही पोलीससुद्धा जखमी झाले असून या प्रकारमुळे येथे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (clash between tow group in Nashik Dindori Mahaje sarpanch election)