महापालिकेमुळे डेंग्यू; पेस्ट कंट्रोल कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची आमदारांची मागणी

महापालिकेच्या (municipality) आरोग्य विभागामुळे नाशिकमध्ये डेंग्यू, (Dengue) चिकुन गुन्यासारखे आजार वाढले आहेत, असा आरोप भाजप आमदार (MLA) प्रा. देवयानी फरांदे यांनी केला आहे.

महापालिकेमुळे डेंग्यू; पेस्ट कंट्रोल कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची आमदारांची मागणी
डेंग्यूचे रुग्ण वाढले.

नाशिकः महापालिकेच्या (municipality) आरोग्य विभागामुळे नाशिकमध्ये डेंग्यू, (Dengue) चिकुन गुन्यासारखे आजार वाढले आहेत, असा आरोप भाजप आमदार (MLA) प्रा. देवयानी फरांदे यांनी केला आहे. (Dengue in the city due to the municipality; MLAs demand filing of case against pest control contractor)

नाशिकमध्ये डेंग्यू आणि चिकुन गुन्याचे थैमान आहे. या आजाराने गेल्या पाच वर्षांतील उच्चांक गाठला आहे. विशेष म्हणजे आमदार फरांदे यांनाही डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णालयातून त्यांनी एक पत्रक काढले आहे. त्यात महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. या पत्रात आमदार फरांदे म्हणतात की, शहरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला आणि रस्त्यावर पाणी साचून डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे डेंग्यूचा प्रसार होतो. या ठिकाणी महापालिकेच्या वतीने औषध फवारणी का होत नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. शहरात फक्त कागदोपत्री धूर, औषध फवारणी केली जाते. त्यामुळं संबंधित कंत्राटदाराची बेकायदा मुदतवाढ रद्द करावी. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. नव्याने कंत्राटदाराची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांचे हात
महापालिकेच्या मलेरिया विभागाची कामगिरी चांगली नाही. हा मुद्दा स्थायी समितीत गाजला. त्यामुळे स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी जीवशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांचे अधिकार काढण्याचे आदेश दिले. मात्र, हे आदेश देऊनही आठ दिवस झाले. मात्र, कारवाई झाली नाही. डॉ. त्र्यंबके यांच्यावर भाजपच्या एका पदाधिकाऱ्याचे हात असून, तोच त्यांचा वाचवत असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे डॉ. त्र्यंबके यांची मुदत संपूनही त्यांना सरकारकडून मिळणाऱ्या मुदतवाढीबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पाच वर्षांतील रुग्ण

नाशिकमध्ये 2017 मध्ये डेंग्यूचे 151 रुग्ण होते, तर चिकुन गुन्याचे 4 रुग्ण होते. 2018 मध्ये डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा 368 वर गेला होता, तर चिकुन गुन्याचे 40 रुग्ण सापडले होते. 2019 मध्ये डेंग्यूचे रुग्ण 177 होते. या वर्षी चिकुन गुन्याच्या रुग्णांचे प्रमाण अत्यंत कमी होते. फक्त 1 रुग्ण सापडला होता. 2020 मध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 115 होती, तर चिकुन गुन्याच्या रुग्णांची संख्या 7 होती. मात्र, 2021 डेंग्यू आणि चिकुन गुन्याच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसते. शहरात डेंग्यूचे रुग्ण 717 वर, तर चिकुन गुन्याचे रुग्ण 537 वर गेले आहेत.(Dengue in the city due to the municipality; MLAs demand filing of case against pest control contractor)

इतर बातम्याः

नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, अकोलामध्ये बांधकाम परवानगी आता ऑफलाइन

NashikGold:सोने 500 रुपयांनी, तर चांदी 1300 रुपयांनी स्वस्त

महापालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरे सक्रिय; 21 सप्टेंबर पासून नाशिक दौऱ्यावर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI