भाजपमधील आऊटगोईंग रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीस उतरणार मैदानात

भाजपची पडझड रोखण्यासाठी आता माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे रिंगणात उतरणार असल्याचे सांगितले जाते. | Devendra Fadnavis

भाजपमधील आऊटगोईंग रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीस उतरणार मैदानात

नाशिक: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील पक्षांकडून भाजपच्या (BJP) नेत्यांना गळाला लावण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची पडझड रोखण्यासाठी आता माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे रिंगणात उतरणार असल्याचे सांगितले जाते. (Devendra Fadnavis will meet bjp leaders in Nashik)

काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये वसंत गीते (Vasant Gite) आणि सुनील बागुल (Sunil Bagul) या दोन बड्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर बुधवारी देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये येणार आहेत. यावेळी ते भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस भाजपमधील डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी नेमकं काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, दोन बडे नेते शिवसेनेत

महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली असताना नाशिकमध्ये भाजपला नुकताच मोठा धक्का बसला होता. वसंत गीते (Vasant Gite) आणि सुनील बागुल (Sunil Bagul) यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला होता.

भाजपकडून नुकतेच शिवसेनेच्या बाळासाहेब सानप यांना गळाला लावण्यात आले होते. भाजपच्या या खेळीला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने लगेचच भाजपला दोन मोठे धक्के दिले. आगामी काळात भाजपचे आणखी काही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जाते.

सानप गेल्याची उणीव भरुन काढणार

माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. ते पंचवटी परिसरात राहतात. पंचवटी परिसरात त्यांचे मोठे प्रस्थ आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेला मोठा फटका बसला असल्याचे सांगितले जात होते. हीच पोकळी भरुन काढण्यासाठी मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे प्रयत्न सुरु होते. त्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेकवेळा नाशिकचा दौरा केला. पंचवटी परिसरातून तब्बल 24 नगरसेवक निवडून जातात.

नाशिकचा महापौर ठरवण्यामागे पंचवटीची नेहमीच मोठी भूमिका राहिली आहे. सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेला किमान 15 जागांवर नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळेच सानप यांनी पक्ष बदलल्याचा वचपा काढण्यासाठीच शिवसेनेने ही फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे.

संबंधित बातम्या:

‘भाजप मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाने सुरुवात’

भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले, आपण पक्ष सोडल्याने अनागोंदी माजणार नाही; महाजनांचा खडसेंना टोला

(Devendra Fadnavis will meet bjp leaders in Nashik)

Published On - 8:34 am, Tue, 12 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI