येवल्यात मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक समोरासमोर, जोरदार घोषणाबाजी

येवल्यात मराठा आंदोलक आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला आहे. मनोज जरांगे पाटील येवल्यात शिवसृष्टीला भेट देण्यासाठी आले त्यावेळी मराठा आंदोलक आणि भुजबळांचे समर्थक आमनेसामने आले.

येवल्यात मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक समोरासमोर, जोरदार घोषणाबाजी
Follow us
| Updated on: Oct 13, 2024 | 10:35 PM

मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे आज येवला दौऱ्यावर आहेत. मनोज जरांगे यांनी येवल्यात आल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. यानंतर त्यांना येवल्यात शिवसृष्टी उभारण्यात आली असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मनोज जरांगे पाटील शिवसृष्टी उभारलेल्या ठिकाणी शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आले. मनोज जरांगे यांनी शिवसृष्टीला भेट दिल्यानंतर ते आपल्या सभास्थळाच्या दिशेला निघाले. पण यावेळी अचानक मराठा कार्यकर्ते आणि मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजूने एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी मराठा कार्यकर्त्यांनी शिवसृष्टीसमोर ठिय्या मांडला.

मराठा कार्यकर्त्यांनी यावेळी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “मनोज जरांगे पाटील हे आज येवल्यात आले होते. ते येवल्यात आले तेव्हा त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केलं. बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी आम्ही इथे आलो. जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण केला. यानंतर आम्ही परतत असताना भुजबळांच्या काही समर्थकांनी शिवाजी महाराजांच्या प्रांगणात जरांगे पाटील यांच्याबाबत अपशब्द वापरले”, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलकाने दिली.

मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

मराठा आंदोलक ठिय्या मांडल्यानंतर प्रचंड आक्रमक झाले. काही मराठा कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केला. मराठा आंदोलकांनी मनमाड- नगर राज्य मार्गावरील विंचूर चौफुलीवर रस्ता रोको केला. भुजबळ समर्थकांनी मराठा कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करत आंदोलकांनी रस्ता रोको सुरू केला. मराठा आंदोलकांच्या आंदोलनामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. यावेळी मराठा समर्थकांची जोरदार घोषणाबाजी केली.

Non Stop LIVE Update
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार.
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न.
तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता..,पवारांची राजकारणातून निवृत्ती?
तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता..,पवारांची राजकारणातून निवृत्ती?.
माझ्या विरोधात षडयंत्र अन्..., अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे भावूक
माझ्या विरोधात षडयंत्र अन्..., अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे भावूक.
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले...
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले....
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर.
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'.
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'.
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास..
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास...
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका.