हेच का नक्षत्रांचं देणं, सोनं पुन्हा स्वस्त होणं; जाणून घ्या नाशिक सराफातले भाव!

सोनं पुन्हा स्वस्त होणं, हेच का नक्षत्रांचं देणं, असं विचारायचं कारण म्हणजे नाशिकच्या सराफा बाजारात गुरुवारीही सोन्याचे दर स्वस्त झाल्याचे दिसले.

हेच का नक्षत्रांचं देणं, सोनं पुन्हा स्वस्त होणं; जाणून घ्या नाशिक सराफातले भाव!
संग्रहित छायाचित्र.
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Oct 07, 2021 | 1:45 PM

नाशिकः सोनं पुन्हा स्वस्त होणं, हेच का नक्षत्रांचं देणं, असं विचारायचं कारण म्हणजे नाशिकच्या सराफा बाजारात गुरुवारीही सोने स्वस्त होते. 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46680 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 44850 रुपये नोंदवले गेले.

सराफा बाजारात गेल्या महिन्यापासून सदाबहार सोने स्वस्तच आहे. सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46500 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 45400 रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे 60600 रुपये नोंदवले गेले. मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46700 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 45500 रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे 61200 रुपये नोंदवले गेले. बुधवारी सोने पुन्हा स्वस्त झाले. 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46680 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 44850 रुपये नोंदवले गेले. तर चांदीचे दर किलोमागे 60650 रुपये नोंदवले गेले. गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46680 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 44850 रुपये नोंदवले गेले. तर चांदीचे दर किलोमागे 60700 नोंदवले गेले. 30 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 47620 होते, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 44480 होते. त्या तुलनेत सध्या तरी सोने स्वस्त झाले आहे. दरम्यान, आता सराफा व्यापाऱ्यांचे डोळे येणाऱ्या दसरा सणाकडे लागले आहेत. साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून दसऱ्याकडे पाहिले जाते. अनेकजण या दिवशी सोन्याची खरेदी करतात. सोन्याच्या अंगठ्या, लॉकेट, नाणे खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असतो. यंदा ऑगस्टपर्यंत नाशिकमध्ये म्हणावा तसा पाऊस नव्हता. मात्र, सप्टेंबरमध्ये जोरदार हजेरी लावली. त्यामुळे दसऱ्याला जोरदार उलाढाल होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

साठवण्याची जोखीम संपली

सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढेच नव्हे तर ‘गुगल पे’वर सोने साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्करावी लागणार नाही.

इतर बातम्याः

नाशिकमध्ये 122 नगरसेवक गॅसवर; कुठला प्रभाग कुठे जोडणार, यावर राजकीय गणित ठरणार!

महापालिकेआधीच राजकीय धुळवड; नाशिकमध्ये 15 ऑक्टोबरपासून तब्बल 192 सहकारी संस्थांच्या निवडणुका


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें