अखेर नाशिकच्या कालिकादेवी मंदिर संस्थानला सुबुद्धी; ग्रामदेवतेच्या पेड दर्शनाचा निर्णय मागे!

अखेर नाशिकमधल्या कालिकादेवी मंदिर संस्थानला सुबुद्धी सुचली असून, नवरात्रोत्सवात ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी आकारलेले शंभर रुपयांचे शुल्क मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, भावकांना ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे.

अखेर नाशिकच्या कालिकादेवी मंदिर संस्थानला सुबुद्धी; ग्रामदेवतेच्या पेड दर्शनाचा निर्णय मागे!
नाशिकमधील कालिकादेवी मंदिर.


नाशिकः अखेर नाशिकमधल्या कालिकादेवी मंदिर संस्थानला सुबुद्धी सुचली असून, नवरात्रोत्सवात ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी आकारलेले शंभर रुपयांचे शुल्क मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, भावकांना ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे.

कोरोना संकटाच्या काळात राज्यातील मंदिरे बंद होती. त्यामुळे अनेक मंदिराचं उत्पन्न पूर्णपणे ठप्प झाले होते. आता घटस्थापनेपासून राज्यातील मंदिरे आणि सर्व धार्मिक स्थळे सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अशावेळी काही मंदिर संस्थानांनी आता भाविकांकडून शुल्क आकारुन दर्शनाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. त्यात नाशिकच्या कालिका मंदिर प्रशासनानेही नवरात्रोत्सव काळात 100 रुपये शुल्क आकारून टोकन पद्धतीने दर्शना देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भाविकांनी पेड दर्शनाला विरोध केला होता. त्यामुळे हा निर्णय अखेर मागे घेण्यात आल आहे.

गरबा-दांडियाचे आयोजन नाही

नाशिक जिल्ह्यात यंदाही नवरात्रोत्सवात साधेपणानेच साजरा करा. या काळात गरबा आणि रास दांडियाचे आयोजन करू नका, असे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट अजून कायम आहे. नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकारने नवरात्रोत्सव मंडळांनासाठी लागू केलेली नियमावली जिल्ह्यातही जशीच्या तशी लागू केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. दसऱ्याच्या दिवशी रावण दहन कार्यक्रमही मोजक्या लोकांच्या उपस्थित साजरा करावा. फेसबूकसारख्या सोशल मीडियावरून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

लसीकरण प्रमाणपत्र दाखवावे लागेल

साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या वणीच्या सप्तशृंगीगडावर नवरात्रोत्सवाची मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे. नवरात्र काळात हे मंदिर 24 तास खुले राहणार आहे. मात्र, भाविकांना पास शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. 65 वर्षावरील व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि लहान मुलांना या काळात गडावर येऊ नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पास मिळवण्यासाठी कोरोनाचे दोन लसीचे डोस घेतल्याचा प्रमाणपत्र किंवा 72 तासांपूर्वी केलेल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक आहे. नवरात्रच्या काळात नांदुरी किंवा सप्तश्रृंगी गडावर यात्रा भरविण्यास बंदी असेल आणि गडावर खासगी वाहनांनाही परवानगी आहे. नांदुरीवरून जाण्यासाठी एसटीची व्यवस्था करण्यात आली आहे.

इतर बातम्याः

अन् अमरीश पटेलांनी जादूची कांडी फिरवलीच…!

परदेशातल्या शिक्षणासाठी आदिवासी विकास विभागाची शिष्यवृत्ती; काय आहे पात्रता, कसा करावा अर्ज?

काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, भाजीने भरलेली पिकअप 35 फूट खोल दरीत कोसळली; नाशिक-मुंबई महामार्गावरली घटना

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI