पदवीधर, शिक्षक मतदारसंघात कोण विजयी, कोण पराभूत? कुणाला किती मते मिळाली?; संपूर्ण माहिती एका क्लिकवर

नाशिकमधील निवडणूक सर्वाधिक चुरशीची आणि लक्ष्यवेधी ठरली. या निवडणुकीत सत्यजीत तांबे विरुद्ध शुभांगी पाटील अशी लढत होती. पण सत्यजित तांबे यांनी हा विजय एकहाती खेचून आणला.

पदवीधर, शिक्षक मतदारसंघात कोण विजयी, कोण पराभूत? कुणाला किती मते मिळाली?; संपूर्ण माहिती एका क्लिकवर
sudhakar adbaleImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 9:19 AM

नाशिक: राज्यातील अमरावती आणि नाशिक पदवीधरसह नागपूर, औरंगाबाद आणि कोकण शिक्षक मतदारसंघापैकी चार मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले आहेत. यात नागपूर, औरंगाबादमध्ये महाविकास आघाडी(maha vikas aghadi) ला विजय मिळाला आहे. तर नाशिकमध्ये अपक्षाने बाजी मारली आहे. कोकणात मात्र भाजपने (bjp) विजय खेचून आणला आहे. तर अमरावतीत महाविकास आघाडीचा उमेदवार आघाडीवर आहे. या पाचही निवडणुकीत महाविकास आघाडीचचं वर्चस्व राहिल्याने भाजप आणि शिंदे गटात एकच खळबळ उडाली आहे. केवळ कोकण शिक्षक मतदारसंघातच भाजपला निखळ विजय मिळाला असून इतर ठिकाणी पानीपत झालं आहे. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या होमपीचवरही भाजपला पराभव पत्करावा लागल्याने भाजपचं टेन्शन वाढलं आहे.

कोकणात भाजप

या पाचही मतदारसंघातील निवडणुकीचा सर्वात पहिला निकाल कोकण शिक्षक मतदारसंघाचा लागला. या निवडणुकीत भाजपचा विजय झाला, भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेकापचे बाळाराम पाटील यांचा पराभव केला. बाळाराम पवार हे विद्यमान आमदार होते. या निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20,800 मते मिळाली. तर शेकापचे बाळाराम पाटील यांना 9500 मते मिळाली. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी 11,300 मताधिक्य घेत आपला विजय नोंदवला आहे.

हे सुद्धा वाचा

सत्य की जीत

नाशिकमधील निवडणूक सर्वाधिक चुरशीची आणि लक्ष्यवेधी ठरली. या निवडणुकीत सत्यजीत तांबे विरुद्ध शुभांगी पाटील अशी लढत होती. पण सत्यजित तांबे यांनी हा विजय एकहाती खेचून आणला. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये सुरू असलेल्या मतमोजणीतील चौथ्या फेरीमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना 60 हजार 161 मते पडली. तर महाविकास आघाडी पुरस्कृत असलेल्या शुभांगी पाटील यांना 33,776 मते पडली आहेत. चौथ्या फिर अखेर 1 लाख 12 हजार मतांची मोजणी पूर्ण झाली आहे

या निवडणुकीत सत्यजित तांबे यांना 68 हजार 999 मते मिळाली. तर शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मते मिळाली. तांबे यांनी तब्बल 29 हजार 465 मताधिक्य मिळवून विजय मिळवला.

चौथ्यांदा विजयी होण्याचा ‘विक्रम’

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात चौथ्यांदा निवडून येण्याचा विक्रम महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांनी केला आहे. विक्रम काळे यांनी भाजपचे उमेदवार किरण पाटील यांचा पराभव केला. या निवडणुकीत विक्रम काळे यांना 23 हजार 577 मिळाली. तर किरण पाटील यांना 16 हजार 663 मते मिळाली. विक्रम काळे यांनी तब्बल 6,914 मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे.

नागपूरमध्ये गाणार यांचा पराभव

नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम पीचवरच भाजपला पराभव स्वीकारावा लागला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना तब्बल 16 हजार 700 मते मिळाली.

तर भाजप पुरस्कृत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांना केवळ 8 हजार 211 हजार मते मिळाली. विशेष म्हणजे नागो गाणार हे दोन टर्म आमदार होते. तरीही त्यांचा पराभव झाला. आडबोले यांनी 8,489 मतांचं मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे.

अमरावतीचा निकाल वेटिंगवर

अमरावती पदवीधर मतदारसंघाचा निकाल अद्याप यायचा बाकी आहे. भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांनी निवडणुकीत अवैध मते पडल्याने फेर मतमोजणीची मागणी केली होती. त्यामुळे फेर मतमोजणी सुरू झालेली आहे. म्हणून अमरावतीचा निकाल लांबला आहे.

मात्र, फेर मतमोजणीतही धीरज लिंगाडे आघाडीवर आहेत. लिंगाडे यांना 43 हजार 577 मते मिळाली आहेत. तर रणजित पाटील यांना केवळ 41 हजार 248 मते मिळाली आहेत. लिंगाडे हे 2366 मते घेऊन आघाडीवर आहेत.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.