Nashik Accident| माहिती सहायक पाटील यांचा अपघाती मृत्यू; कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याच्या निधनाने जिल्ह्यात हळहळ

मालेगावच्या कोरोना संकटात मनोहर पाटील यांनी खूप चांगले काम केले. जिल्ह्यातील माध्यम सृष्टीला सदैव संस्मरणात राहील, असेच त्यांचे काम होते. नुकताच राज्याचे माहिती जनसंपर्क सचिव यांच्या हस्ते त्यांचा त्यासाठी गौरवही करण्यात आला होता.

Nashik Accident| माहिती सहायक पाटील यांचा अपघाती मृत्यू; कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याच्या निधनाने जिल्ह्यात हळहळ
Manohar Patil
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 9:29 AM

नाशिकः मालेगाव उपमाहिती कार्यालयातील माहिती सहायक मनोहर पाटील यांचा अपघाती मृत्यू झालाय. मालेगावहून धुळ्याला जाताना देवारपाडे शिवारात त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. यात त्यांचे निधन झाले. ते 45 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत असून, एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला मुकल्याची भावना व्यक्त होत आहे.

धुळ्यात होते स्थायिक

पाटील 2001 मध्ये माहिती व जनसंपर्क विभागात लिपिक म्हणून रुजू झाले होते. सुरुवातीला त्यांनी धुळे माहिती कार्यालयात काम केले. नंतर जळगाव, चाळीसगाव येथे काम केले. 1 एप्रिल 2020 मध्ये त्यांना बढती मिळाली. त्यानंतर ते मालेगाव उपविभागीय माहिती कार्यालयात माहिती सहायक म्हणून काम पाहिले. पाटील हे पारोळा तालुक्यातील करमाळ गावचे होते. त्यांचे वडील धुळे येथे राज्य परिवहन विभागात कार्यरत होते. त्यामुळे ते धुळे येथेच स्थायिक झाले. पाटील हे मालेगावहून धुळ्याला आपल्या घरी चालले होते. तेव्हा देवारपाडे शिवारात त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यात ते गंभीर जखमी झाले. सुरुवातीला त्यांना मालेगाव येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांना नाशिकला हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

कोरोना काळात काम

मालेगावच्या कोरोना संकटात मनोहर पाटील यांनी खूप चांगले काम केले. जिल्ह्यातील माध्यम सृष्टीला सदैव संस्मरणात राहील, असेच त्यांचे काम होते. नुकताच राज्याचे माहिती जनसंपर्क सचिव यांच्या हस्ते त्यांचा त्यासाठी गौरवही करण्यात आला होता. मृदभाषी, दांडगा जनसंपर्क, वक्तशीर, अत्यंत सचोटीची कर्तव्यनिष्ठा आणि विनम्र असणाऱ्या मनोहर पाटील यांचा वृत्तांकनात, लेखनात हातखंडा होता. ज्यांना शासकीय जनसंपर्काची खरी नस समजली होती, अशा राज्याच्या माहिती संवर्गातील मोजक्या संवादकांपैकी ते एक होते. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांसोबतच शासकीय जनसंपर्क क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.

पालकमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मालेगाव उपमाहिती कार्यालयातील माहिती सहाय्यक मनोहर पाटील यांच्या अपघाती निधनाने प्रसारमाध्यमे आणि शासन संवादातील दुवा हरपला असून, त्यामुळे जनसंपर्क क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना या संकटातून बाहेर पडण्याचे बळ देवो, अशा भावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोक संदेशात व्यक्त केली आहे.

इतर बातम्याः

Mata Vaishno Devi | वैष्णो देवी मंदिर परिसर चेंगराचेंगरी, मृतांच्या नातेवाईकांना जम्मू-काश्मीर सरकार 10, तर केंद्राकडून 2 लाखांची मदत

वर्षभरात जम्मू काश्मीरमध्ये 171 दहशतवाद्यांचा खात्मा; अजूनही 168 सक्रीय दहशतवादी, पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांची माहिती

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.