Nashik : राऊतांच्या आरोपानंतर भुजबळही म्हणतात, नाशिक महापालिकेत भ्रष्टाचार झाला; सद्सदविवेक बुद्धीने काम करण्याचा डोस

भारतीय जनता पक्षाची सत्ता असणाऱ्या नाशिक (Nashik) महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. त्यानंतर सोमवारी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी महापालिकेतील झालेला भ्रष्टाचार मी नाकारत नाही, असे म्हणत राऊतांच्या आरोपात ऐन निवडणुकीच्या तोंडावर जोरदार हवा भरली.

Nashik : राऊतांच्या आरोपानंतर भुजबळही म्हणतात, नाशिक महापालिकेत भ्रष्टाचार झाला; सद्सदविवेक बुद्धीने काम करण्याचा डोस
छगन भुजबळ, पालकमंत्री.
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 3:18 PM

नाशिकः भारतीय जनता पक्षाची सत्ता असणाऱ्या नाशिक (Nashik) महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. त्यानंतर सोमवारी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी महापालिकेतील झालेला भ्रष्टाचार मी नाकारत नाही, असे म्हणत राऊतांच्या आरोपात ऐन निवडणुकीच्या तोंडावर जोरदार हवा भरली. तसेच महापालिकेत जात प्रशासनाची झाडाझडती घेतली. नवी बॉडी येईपर्यंत सद्सदविवेक बुद्धीने काम करा, असा डोसही दिला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, मीडियात उलटसुलट प्रतिक्रिया आल्यास आम्ही सुधारण करण्यास सांगू. प्रशासक राजवटीतील कामाचा आढावा घेण्यासाठी आलो आहे. नाशिकची स्काय लाइन खराब करू नका, असे आवाहन केले. नदीतील घाण पाणी ताबडतोब थांबवा. गार्डन सुरू करा. सभागृह भाडेवाढीवर मार्ग काढून सुरू करा. काही गोष्ट नागरिकांना मोफत द्या. नंदिनी नदीवरील काय करत येईल, ते लवकर करा पावसाळ्याआधी विकासकामे पूर्ण करून घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

स्मारके सुरू करावीत…

भुजबळ म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे स्मारक, दादासाहेब फाळके स्मारक यांची जबाबदारी महापालिकेने घेऊन ती सुरू करावीत. त्यांची प्रवेश फी साधारण ठेवावी. काही स्वस्त, काही मोफत सेवा महापालिकेने द्यावी. नवीन बॉडी येईपर्यंत सद्सदविवेक बुद्धीने काम करावे. शाळा, दवाखाने व्यवस्थित चालवण्याचा निर्णय घ्यावा. हेरिटेज कमिटी तयार करावी. जुन्या वास्तूंना धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी. गावाचे गावपण टिकवा. म्हाडासंदर्भात त्या विभागाचे लोक कारवाई करतील. महापालिकेतील भ्रष्टचार मी नाकारत नाही, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

माप जमूनही सोमय्या गेले…

भुजबळांनी महापालिकेत जाण्यापू्र्वीही माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी ते म्हणाले की, लोकशाहीमध्ये कुणी-कुणालाही भेटू शकतो. पडताळणी करणे त्या यंत्रणेचे काम आहे. परिस्थिती बिघडली असती, तर ते दिल्लीला जाऊ शकले नसते. माप जमले असताना देखील सोमय्या तिकडे गेले. वातावरण खराब करून राष्ट्रपती राजवट लागू करा, ही त्यांची एकमेव मागणी आहे, पण राष्ट्रपती राजवट लागू करण इतकं सोपं आहे का, असा सवाल त्यांनी केला. दिल्लीत गोळीबार झाला. इतरही राज्यात काही घटना घडली आहेत. याची आठवण त्यांनी करून दिली.

बाळासाहेबांनी नमाजाला जागा दिली…

भुजबळ म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंना देखील काही मुस्लिम नागरिक भेटायला आले होते. तेव्हा नमाजची वेळ असल्याने बाळासाहेबांनी देखील त्यांना एका रूममध्ये नमाजासाठी जागा दिली होती. श्रद्धा वैयक्तिक विषय असताना त्यांना उगाच राजकीय आणि आव्हान देऊ नये. लता मंगेशकर पुरस्कार कार्यक्रमात मुख्यमंत्री यांचे नाव नव्हते. खरं तर शिवसैनिक लता मंगेशकर असताना आणि त्या गेल्यावर देखील त्यांना मदत केल्याचे ते म्हणाले.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.