AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat: अत्यंत धक्कादायक, खरातला जमीन विकल्यापासून मुलगाच गायब, वडिलांच्या आरोपाने मोठी खळबळ

Ashok Kharat Case: नाशिकचा भोंदू ज्योतिषी अशोक खरात याचे धक्कादायक कारनामे एकामागून एक समोर येत आहे. महिलांचे लैंगिक शोषण, अल्पवयीन मुलींसोबत गैरकृत्य, शेतकऱ्यांच्या जमिनी हडपणे आणि तर त्याच्यावर माणसंच बेपत्ता केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

Ashok Kharat: अत्यंत धक्कादायक, खरातला जमीन विकल्यापासून मुलगाच गायब, वडिलांच्या आरोपाने मोठी खळबळ
Ashok Kharat CaseImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Mar 22, 2026 | 11:03 AM
Share

Ashok Kharat Case: नाशिकचा भामटा आणि भोंदू ज्योतिषी अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. महिला भाविकांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याचे अघोरी कृत्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. अत्यंत किळसवाणे प्रकार तो करत असल्याचे समोर आले आहे. लोकांच्या जमिनी त्याने लाटल्या आहेत. दमदाटी करून त्याने जमीन हडपल्याची माहिती समोर येत आहे. त्याला याकामी राजकीय पुढारी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांनी मदत केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर खरात याने जमीन बळकावून मुलालाच गायब केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. तपास जसा वेगाने पुढे सरकत आहे, तसतसे अनेक भयावह प्रकार समोर येत आहे. त्यामुळे या भामट्याला ज्यांनी ज्यांनी पाठीशी घातले. जे मंत्री त्याला भेटले, त्या सर्वांची कसून चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

जमीन विकली आणि मुलगा गायब

भोंदूबाबा अशोक खरातला जमीन विकली आणि त्या दिवसापासून मुलगा बेपत्ता झाल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. नाशिकच्या पाथर्डी शिवारातील शिवाजी ढगे यांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे. ते म्हणाले की, मुलावर काय भुरळ घातली माहिती नाही. मात्र मुलाने जमीन विकली त्या दिवसापासून तो बेपत्ता आहे. खरात याने अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी घेऊन त्यांचे पैसेच दिले नाहीत, असा आरोपही ढगे यांनी केला.

खरातची पाथर्डी शिवारात कोट्यवधींची जमीन

भोंदू बाबा अशोक खरातची नाशिकच्या पाथर्डी शिवारात कोट्यवधींची जमीन आहे. त्याने सगळ्या जागांना कंपाऊंड केले आहे. अशोक खरात हा अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशीच आपल्या जागा बघण्यासाठी यायचा अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. अनेक वेळेस एजंट दीपक लोंढे हा देखील खरात याच्या सोबत असायचा. त्यांनी गावात काही वेळेस दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. खरात याने पाथर्डी शिवारात अनेक व्यवहारात पैसे बुडवल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

दिलीप वळसे पाटील यांच्या कानपिचक्या

कॅप्टन खरात यांच्या प्रकरणात गुंतलेल्यांना माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चांगलच सुनावताना “अध्यात्म वेगळं असतं, पण सध्या अध्यात्माच्या नावाखाली कर्मकांड करायला शिकवलं जातं. एखादा व्यक्ती जर अध्यात्म सोडून कर्मकांड करू लागला किंवा कर्मकांडात गुंतला तर त्यातून तो बाहेर पडू शकत नाही. आणि त्याचे चांगले वाईट परिणाम त्याला सोसावे लागतात.” असं मत व्यक्त केलं आहे. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे एका खाजगी कार्यक्रमात माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!