नाशिककरांवरील म्युकर मायकोसिसचं संकट कायम, 180 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु

कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्रात म्युकर मायकोसिसचं संकट ओढावलं होतं. नाशिक जिल्ह्यातील कोरोना संकट कमी होत असलं तरी म्युकर मायकोसिसचं संकट कायम आहे.

नाशिककरांवरील म्युकर मायकोसिसचं संकट कायम, 180 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु
सांकेतिक फोटो

नाशिक: कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्रात म्युकर मायकोसिसचं संकट ओढावलं होतं. नाशिक जिल्ह्यातील कोरोना संकट कमी होत असलं तरी म्युकर मायकोसिसचं संकट कायम आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत म्युकर मायकोसिसचे 776 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सध्या 180 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण नाशिकमध्ये आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक संजय थोरात यांनी दिली आहे.

नाशिकमध्ये म्युकर मायकोसिसचे किती रुग्ण

कोरोनाचा धोका कमी होत असला, तरी नाशिकमध्ये म्युकरमायक्रोसिस चा धोका मात्र कायम असल्याचं जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्याचे 776 रुग्ण आढळून आले होते,त्यापैकी सद्यस्थितील म्युकर मायकोसिसचे जिल्ह्यात 180 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण असून आतापर्यंत 64 रुगणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान नागरिकांनी लक्षण दिसताच तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

कोरोना मृत्यूचं ऑडिट करण्याचे आदेश

नाशिक शहरातील कोरोना मृत्यूचं ऑडिट करण्याचे आदेश मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्शवभूमीवर हे आदेश देण्यात आले आहेत. दुसऱ्या लाटे दरम्यान झालेल्या सगळ्या मृत्यूचे ऑडिट करण्यात येणार आहे. तिसऱ्या लाटेच्या नियोजनाचा भाग म्हणून ऑडिट करण्यात येत असल्याचा दावा करण्यात आलाय.

नाशिक शहरातील लसीकरण मोहीम विस्कळीत

नाशिक शहराला कोरोना प्रतिबंधक लसी कमी प्रमाणात मिळत असल्याचं समोर आलं आहे. शुक्रवारी नाशिक शहराला 5700 डोस मिळाले होते. लसीकरण मोहीम एक दिवस सुरू तर दोन दिवस बंद अशी परिस्थिती कायम आहे. सर्वच आरोग्य केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागत असल्याचं चित्र आहे. लसीकरणाच्या अनियमिततेमुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असल्याचं समोर येतंय.

तिसऱ्या लाटेसाठी प्रशासनाची तयारी

कोरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी महापालिका प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. पालिकेकडून 1780 ऑक्सिजन बेडच्या उभारणीला सुरुवात करण्यात आली आहे. तर, तिसऱ्या लाटेपूर्वी नोकरभरती साठी गर्दी करण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या पदांसाठी शेकडो तरुणांची महापालिकेत गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

नाशिक कोरोना अपडेट 24 जुलै 2021

आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 139
पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 105

नाशिक मनपा- 62
नाशिक ग्रामीण- 40
मालेगाव मनपा- 00
जिल्हा बाह्य- 03

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8491

शनिवारी कळवलेले मृत्यू:- 02
नाशिक मनपा- 01
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 01
जिल्हा बाह्य- 00

इतर बातम्या:

नाशिकमध्ये पावसाची उघडीप, पाणी कपात कायम राहणार, महापालिका आयुक्तांची माहिती

अतिवृष्टी, पूरग्रस्तांना 10-10 किलो गहू तांदूळ, 5 लिटर केरोसीन, 5 किलो डाळ देणार, छगन भुजबळ यांची माहिती

(Nashik corona update 180 active patients of Mucormycosis taking treatment in Nashik hospital said by health department )

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI