Nashik Corona|नाशिकमध्ये कोरोना रुग्णांचा गुणाकार; अत्यंत झपाट्याने वाढ, आजची संख्या…

कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता शहरात 3300 बेड तयार ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी 2200 खाटांना ऑक्सिजनची सुविधा आहे.

Nashik Corona|नाशिकमध्ये कोरोना रुग्णांचा गुणाकार; अत्यंत झपाट्याने वाढ, आजची संख्या...
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 1:07 PM

नाशिकः नाशिकमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये अत्यंत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. सध्या जिल्ह्यात तब्बल 691 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील तब्बल 438 रुग्ण आहेत. विशेष म्हणजे कुठेही कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले जात नाही. नागरिक मास्क वापरत नाहीत. मोठमोठ्या नेत्यांचे विवाह सोहळे मोठ्या धूमधडाक्यात सुरू आहेत. यामुळेच कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे समोर येत आहे.

येथे आहेत रुग्ण

नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 4 हजार 770 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 691 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 756 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 39, बागलाण 16, चांदवड 06, देवळा 18, दिंडोरी 49, इगतपुरी 8, मालेगाव 04, नांदगाव 05, निफाड 49, सिन्नर 21, सुरगाणा 02, त्र्यंबकेश्वर 04, येवला 11 अशा एकूण 232 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 438, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 10 तर जिल्ह्याबाहेरील 11 रुग्ण असून असे एकूण 691 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 14 हजार २१७ रुग्ण आढळून आले आहेत.

4000 मेट्रीक टन ऑक्सिजन साठा

नाशिकमध्ये कोरोनाची दुसरी लाट भयंकर होती. ऑक्सजिनसाठी लोकांनी रस्त्यावर अक्षरशः रांगा लावल्या होत्या. याचे भयावह चित्र मीडियातून पुढे आले होते. हे पाहता आता महापालिकेने ऑक्सिजनची चोख व्यवस्था केली आहे. दररोज 4000 मेट्रीक टन ऑक्सिजन साठा उपलब्ध ठेवला जात आहे. त्यासाठी ऑक्सिजन निर्मिती करणारे 23 प्रकल्प उभारले आहेत. त्यातून 23 मेट्रीक टन ऑक्सिजनची रोज निर्मिती होणार आहे. द्रवरूप ऑक्सिजनसाठी 246 मेट्रीक टन क्षमतेच्या 19 टाक्या आहेत. 130 मेट्रीक टन साठ्याचे 7271 ऑक्सिजन सिलिंडरही तयार ठेवण्यात आले आहेत.

इतरही सुविधा

कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता शहरात 3300 बेड तयार ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी 2200 खाटांना ऑक्सिजनची सुविधा आहे. बिटको रुग्णालयात ऑक्सिजनच्या सर्वाधिक साडेसहाशे खाटा आहेत. त्यात गरज पडल्यास 250 खाटा वाढवण्याची तयारी करण्यात आली आहे. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात 150, ठक्कर डोम 325, संभाजी स्टेडियम येथे 280 खाटांची सोय करण्यात आली आहे. मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये 180 खाटा, समाजकल्याण कार्यालय कोविड सेंटर 500 खाटा, मोरी कोविड सेंटर 200 खाटा, अंबर सेंटर 300 खाटा, सातपूर मायको रुग्णालय 50, सावतानगर क्रॉम्प्टन हॉल 60 ऑक्सिजन खाटा आहेत.

इतर बातम्याः

Nashik|मालेगावमध्ये कोरोना लसीकरण नोंदणीत घोळ, चौकशीपूर्वीच 10 शिक्षकांचे निलंबन रद्द

Property Tax|नाशिकमध्येही मालमत्ता करमाफी होण्याची शक्यता; पालकमंत्री छगन भुजबळांनी काय दिले संकेत?

Malegaon scam| कृषिमंत्री दादा भुसे यांच्या तालुक्यात 89 कोटींचा अनुदान वाटप घोटाळा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.