AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहशतवाद्याने बँक खाते वापरले; 12 दिवस हाउस अरेस्ट, नाशिकमधील व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं?

नाशिकमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात एका कंपनीत काम करत असलेल्या अधिकाऱ्याकडून जवळपास 90 लाख रुपये उकळण्यात आले. या अधिकाऱ्याला एक फोन आला आणि सांगण्यात आले की तुमचे खाते दहशतवाद्याने वापरले आहे. त्यानंतर जे घडलं पोलीसही थक्क झाले.

दहशतवाद्याने बँक खाते वापरले; 12 दिवस हाउस अरेस्ट, नाशिकमधील व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं?
NashikImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 30, 2026 | 7:47 AM
Share

नाशिकमध्ये एका खासगी कंपनीच्या अधिकाऱ्याकडून सायबर गुन्हेगारांनी दहशतवादाची भीती दाखवत तब्बल ९० लाख रुपये उकळले आहेत. गुन्हेगारांनी स्वतःला एटीएस आणि मुंबई पोलिस असल्याचे भासवत पीडित अधिकाऱ्याला १२ दिवस घरातच अटक (हाउस अरेस्ट) करून ठेवले. या कालावधीत त्यांच्याशी व्हॉट्सअॅपवरून संवाद साधला आणि बँक खात्यातील रक्कम रिझर्व्ह बँकेमार्फत तपासण्याची गरज असल्याचे सांगत पैसे हस्तगत केले.

नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित अधिकाऱ्याला फोन आला. बोलणारे स्वतःला एटीएसचे अधिकारी म्हणत होते. त्यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये आधार कार्ड वापरून काही बँक खाती उघडली गेली आहेत. त्या खात्यांमधून आतंकवाद्यांनी मनी लॉण्डरिंग केले असल्याचा संशय आहे. या खात्यांशी पीडित अधिकाऱ्याच्या बँक खात्याचा संबंध जोडला जाऊ शकतो, अशी भीती दाखवली. त्यामुळे तपासासाठी त्यांना ताब्यात घ्यावे लागेल, असे सांगत अधिकाऱ्याला घरातच अटक करण्यात आल्याचे जाहीर केले.

12 दिवस हाउस अरेस्ट

पुढील १२ दिवस गुन्हेगारांनी चार वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून व्हॉट्सअॅपवरून संवाद ठेवला. त्यांनी सांगितले की, बँक खात्यात शिल्लक असलेल्या रकमेची रिझर्व्ह बँकेमार्फत चौकशी करावयाची आहे. त्यासाठी पैसे तीन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर करावेत, असे निर्देश दिले. भीतीच्या वातावरणात अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे पैसे पाठवले. अशा प्रकारे एकूण ९० लाख रुपये उकळले गेले.

ही फसवणूक पूर्णपणे सायबर माध्यमातून झाली. गुन्हेगारांनी अधिकाऱ्याशी प्रत्यक्ष भेट न घेता केवळ फोन आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संवाद साधला. दहशतवाद आणि एटीएससारख्या गंभीर विभागाचे नाव घेतल्याने पीडिताला भीती वाटली आणि त्याने पोलिसांकडे तक्रार करण्यापूर्वीच पैसे देऊन टाकले. नाशिक पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून चौकशी सुरू आहे. सायबर गुन्हेगारी वाढत असताना नागरिकांनी अशा फोन कॉल आणि संदेशांकडे सावध राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. कोणत्याही सरकारी संस्थेकडून बँक खात्यातील पैसे दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगितले जात नाही, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक