वनराई, पाऊस, धुकं, पक्ष्यांचा किलबिलाट, फेसाळणारे धबधबे; पर्यटकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारं इगतपुरी!

मागील आठवड्यापासुन इगतपुरी तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने तालुक्यातील धरण साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी डोंगर उतारावरून पाण्याचे धबधबे सुरू झाल्याने पर्यटकांची इकडे गर्दी वाढत आहे.

वनराई, पाऊस, धुकं, पक्ष्यांचा किलबिलाट, फेसाळणारे धबधबे; पर्यटकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारं इगतपुरी!
पावसामुळे ठिकठिकाणी डोंगर उतारावरुन धबधबे वाहू लागल्याने पर्यटकांची इकडे गर्दी वाढत आहे.
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 12:09 PM

नाशिक : मागील आठवड्यापासुन इगतपुरी तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने तालुक्यातील धरण साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी डोंगर उतारावरुन धबधबे वाहू लागल्याने पर्यटकांची इकडे गर्दी वाढत आहे.

कोरोनाचा काळ सुरु पण हौशी पर्यटकांची छुप्या पद्धतीने पर्यटनस्थळी हजेरी

तालुक्यात भावली डॅम, अशोका धबधबा, वैतरणा डॅम, भंडारदरा धरण, दारणा धरण, नगरपालिका डॅम, रेल्वे तलाव, तळेगाव डॅम, कपारेश्वर महादेव, घाटनदेवी मंदिर, उंटदरी, भाम धरण तसेच विश्वविख्यात विपश्यना केंद्र ही येथेच आहेत. या सर्वच ठिकाणी पर्यटनासाठी मोठी गर्दी होत आहे. कोरोनाचा काळ असल्याने येथे पर्यटकांना येण्यासाठी बंदी असूनही चोरी छुप्या मार्गाने पर्यटक शनिवार व रविवारी मोठया प्रमाणात हजेरी लावत आहे.

इगतपुरी तालुक्याचा स्वर्ग समजला जाणारा भावली धरण परिसर… निसर्गराजाने नेत्रात साठवता येणार नाही एवढी भरभरुन दिलेली वनराई… धुंद करणारा पाऊस… क्षणात पालटणारं धुकेमय वातावरण…घनदाट वृक्षांची छाया… फेसाळणारे धबधबे… खोल खोल दऱ्या… हंबरत हंबरत चरणारी गायी गुरे…किलबिलाट करणारे पक्ष्यांचे थवे…रानफुलांचा मंद सुगंध…अशा प्रकारे विविध अंगांनी शेकडो पर्यटकांचं इथला धरण स्वागत करतो.

पर्यटनस्थळी हजारो पर्यटकांची गर्दी

अशा वातावरणात पावसाळी पर्यटनाचा आनंद काही औरच! आणि त्यातही धबधब्याखाली चिंब भिजायला कुणाला आवडणार नाही? त्यासाठीच पावसाळी पर्यटनासाठी त्यातल्या त्यात योग्य वातावरण आणि योग्य ठिकाणाचा शोध हौशी पर्यटकांकडून घेतला जातोय. या पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मुंबई, नाशिक, पुणे अशा महाराष्ट्राच्या विविध भागातून शनिवार, रविवारी व सुट्टीच्या काळात हजारो पर्यटक भेट देऊन आनंद घेत असतात.

मॉन्सून डेस्टिनेशनच्या शोधात आहात?

उष्ण वातावरणातही पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल तर कसारा घाटातील विहिगाव ( ता.शहापुर ) येथील “अशोका धबधबा” व तळेगाव येथील कपारेश्वर महादेव, रेल्वे तलाव नगरपरिषद डॅम व धबधबा हा वन डे मॉन्सून डेस्टिनेशनच्या शोधात असणाऱ्या पर्यटकांसाठी एक उत्तम पर्याय आहेत…

(Nashik Igatpuri Waterfall Flowing Crowds of tourists at igatpuri Waterfall)

हे ही वाचा :

नो हेल्मेट, नो पेट्रोल मोहिमेला नाशिकमध्ये अल्प प्रतिसाद, नागरिकांसह पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांकडून केराची टोपली

VIDEO : नाशिकमध्ये तृतीयपंथीयांचा राडा, टोलनाक्यावर प्रवाशांना शिवीगाळ-बाचाबाची, नंतर मारहाण, तुफान हाणामारीचा व्हिडीओ समोर

जामीन फेटाळताच छातीत ‘कळ’, लाच प्रकरणातील आरोपी वैशाली वीर-झनकर रुग्णालयात

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.