AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणुकीचे कल स्पष्ट, सत्ताधारी पॅनलचे अध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील ढिकले यांचा विजय…

राज्यातील दोन नंबरची शैक्षणिक संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणुकांचे कल स्पष्ट झालेयंत. दिग्गजांना धक्का देत परिवर्तन पॅनलची सरशी बघायला मिळाली. इतकेच नाही तर सरचिटणीस नीलिमा पवार यांचाही या निवडणूकीमध्ये मोठा पराभव झालायं

Nashik | मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणुकीचे कल स्पष्ट, सत्ताधारी पॅनलचे अध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील ढिकले यांचा विजय...
| Edited By: | Updated on: Aug 30, 2022 | 8:31 AM
Share

नाशिक : नाशिकच्या (Nashik) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणूका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होत्या. आता या निवडणूकीच्या निकालाचे कल स्पष्ट झालेयंत. मराठा विद्या प्रसारक समाज संस्था ही राज्यातील दोन नंबरची मोठी संस्था असल्याने सर्वांच्या नजरा या निवडणूकीकडे (Election) लागल्या होत्या. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाल्याचे बघायला मिळाले असून दिग्गजांना मोठा धक्का या निवडणूकीमध्ये बसलायं. परिवर्तन पॅनलची सरशी या निवडणूकीमध्ये दिसून आली. या निवडणूकीचा अतिशय धक्कादायक (Shocking) निकाल आलायं.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणुकांचे कल स्पष्ट

राज्यातील दोन नंबरची शैक्षणिक संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणुकांचे कल स्पष्ट झालेयंत. दिग्गजांना धक्का देत परिवर्तन पॅनलची सरशी बघायला मिळाली. इतकेच नाही तर सरचिटणीस नीलिमा पवार यांचाही या निवडणूकीमध्ये मोठा पराभव झालायं. नीलिमा पवार यांचा पराभव नितीन ठाकरे यांनी केलायं. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणूकांमध्ये दिग्गजांना धक्का बसलायं.

सरचिटणीस नीलिमा पवार यांचा निवडणूकीमध्ये मोठा पराभव

या निवडणूकीमध्ये सत्ताधारी पॅनलचे अध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील ढिकले यांचा विजय झालायं. आमदार माणिकराव कोकाटे यांचा पराभव करत सुनील ढिकले यांचा विजय झाला. ढिकले हे भाजप आमदार राहुल ढिकले यांचे बंधू आहेत. यामुळे भाजपाचा ढिकले यांना या निवडणूकीमध्ये सपोर्ट असल्याचे सांगितले जात होते. मात्र, सरचिटणीस नीलिमा पवार यांचा दारून पराभव या निवडणूकीमध्ये झाल्याने आर्श्चय व्यक्त केले जातंय.

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...