Nashik Unlock : नाशिकमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता, आजपासून हॉटेल उघडले, काय सुरू काय बंद?

राज्यात सरकारने कोरोनाचे नवे निर्बंध जारी केलेत. यानुसार काही ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आलेत, तर काही ठिकाणी निर्बंध वाढलेत. यात नाशिकला दिलासा मिळाला असून आजपासून निर्बंध शिथिल करण्यात आलेत.

Nashik Unlock : नाशिकमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता, आजपासून हॉटेल उघडले, काय सुरू काय बंद?
Nashik Municipal corporation


नाशिक : राज्यात सरकारने कोरोनाचे नवे निर्बंध जारी केलेत. यानुसार काही ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आलेत, तर काही ठिकाणी निर्बंध वाढलेत. यात नाशिकला दिलासा मिळाला असून आजपासून निर्बंध शिथिल करण्यात आलेत. नाशिकमध्ये आता हॉटेलमध्ये 50 टक्के ग्राहकांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच दुपारनंतर पार्सल सुविधा देखील सुरू ठेवता येईल.

नाशिकमधील निर्बंध शिथिल झाल्यानं गेल्या दीड वर्षांपासून अडचणीत आलेल्या मिसळ व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मिसळची नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या मिसळ व्यावसायिकांच्या आशा पल्लवित झाल्यात. आता यामुळे व्यावसायाची गाडी रुळावर यायला मदत होईल अशी भावना ते व्यक्त करत आहेत.

नाशिकमध्ये काय सुरू?

 • सोमवार ते शुक्रवार सर्व दुकानांना रात्री 8 पर्यंत परवानगी
 • मॉल्स खुले होणार
 • रविवारी फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी
 • सर्व खासगी आणि सरकारी कार्यालयांना, पूर्ण क्षमतेनं काम करण्यास परवानगी
 • उद्यान, मैदान खुले करण्यास परवानगी
 • ब्युटीपार्लर, स्पा, सलूनला 8 पर्यंत परवानगी
 • जिम्नॅशिअम, योगा क्लास सुरू होणार
 • हॉटेल्स दुपारी 4 पर्यंत 50 टक्के क्षमतेनं परवानगी
 • पार्सल व्यवस्था नियमित सुरू

नाशिकमध्ये काय बंद?

 • मल्टिप्लेक्स बंदच राहणार
 • रविवारी निर्बंध कायम

हेही वाचा :

लासलगाव बाजार समितीत टोमॅटोचा लिलाव सुरू, शेतकऱ्यांची तोबा गर्दी

नाशिकमध्ये 15 ऑगस्टपासून हेल्मेट सक्ती, नियम मोडल्यास किती दंड ठोठावणार?

निफाडच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, काकासाहेब वाघ साखर कारखाना सुरु होणार, कर्मचाऱ्यांकडून तयारी सुरु

व्हिडीओ पाहा :

Nashik Unlock restriction updates Hotels started from 3 August 2021

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI