निफाडच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, काकासाहेब वाघ साखर कारखाना सुरु होणार, कर्मचाऱ्यांकडून तयारी सुरु

कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचे यंदा बॉयलर पेटणार आहे. साखर कारखाना सुरु होणे ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

निफाडच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, काकासाहेब वाघ साखर कारखाना सुरु होणार, कर्मचाऱ्यांकडून तयारी सुरु
काकासाहेब वाघ साखर कारखाना
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 4:42 PM

नाशिक: कृषिप्रधान असलेल्या निफाड तालुक्यातील रानवड येथील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचे यंदा बॉयलर पेटणार आहे. साखर कारखाना सुरु होणे ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. चालू हंगामासाठी शेतकऱ्यांनी ऊसाची नोंदणी सुरू झाल्याने ऊस नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ऊस शेती मोठ्या प्रमाणात

निफाड तालुक्यातुन जात असलेल्या गोदावरी, दारणा आणि कादवा तीन नद्यांच्या संगमावर नांदूरमधमेश्वर धरणाची निर्मिती ब्रिटिश काळात झाली होती. तीन नद्यांवरील धरणांमुळे मुबलक असे पाणी असल्याने गेल्या काही वर्षांपासून शेतकरी हे ऊसाची मोठ्या प्रमाणात शेती करतात. ऊसाचे उत्पादन घेतल्यानंतर ऊस विकण्यासाठी शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यात जावे लागत होते. मात्र, रानवड येथे कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याची निर्मिती करण्यात आली होती.

गेल्या काही वर्षापासून तांत्रिक कारणामुळे कारखाना हा बंद चालू राहत होता. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे हाल होत असल्याने निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या माध्यमातून रानवड येथील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना हा भाडेतत्त्वावर स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्थेला सुरू करण्याची परवानगी महाराष्ट्र शासनाने दिल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण

कारखाना सुरु होणार असल्याने कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या कारखान्यात तीन लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. साखर कारखाना वेळत सुरु करण्यासाठी कामगार मेंटेनन्स कामात मग्न दिसत आहे.

कारखान्यातील ज्येष्ठ कामगार रामदास जाधव यांनी साखर कारखाना गेल्या दीड हंगामापासून बंद होता, असं सांगितलं. मात्र, आता कारखाना पुन्हा सुरु होत असल्यानं आनंद होत असल्याचं सांगितलं आहे.

इतर बातम्या:

नाशिककरांना मोठा दिलासा, पाणी कपात रद्द, महापालिका आयुक्तांचा निर्णय

Weather Forecast: आयएमडीकडून ऑगस्ट सप्टेंबरसाठी हवामानाचा अंदाज जारी, महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी राहणार?

Nashik Nifad Kakasaheb Wagh sugar mill restart from this season farmers happy for decision

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.