नाशिककरांना मोठा दिलासा, पाणी कपात रद्द, महापालिका आयुक्तांचा निर्णय

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणी साठी 50 टक्केंच्या खाली आल्यानं शहरात दर गुरुवारी पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

नाशिककरांना मोठा दिलासा, पाणी कपात रद्द, महापालिका आयुक्तांचा निर्णय
नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणी वाढले आहे.

नाशिक: जून महिन्यात आणि जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात नाशिक जिल्ह्याकडे मान्सूनच्या पावसानं पाठ फिरवली होती. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणी साठी 50 टक्केंच्या खाली आल्यानं शहरात दर गुरुवारी पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावल्यानं नाशिक शहरातील पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकचे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी ही माहिती दिली.

गंगापूर धरणातील मुबलक पाणी साठ्यामुळं निर्णय

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेली पाणीकपात रद्द करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी आज दिली. नाशिकच्या गंगापूर धरणासह इतर धरणांमध्ये देखील मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने तूर्तास पाणीकपात रद्द करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.दोन आठवड्यांपूर्वी नाशिक महापालिकेच्या वतीने पावसाने ओढ दिल्यामुळे पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र, आयुक्तांच्या पाणीकपात रद्द च्या घेण्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे

गंगापूर धरणातील पाणी कमी झाल्यानं पाणी कपात

गंगापूर धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे नाशिक शहरात गेल्या 15 दिवसांपूर्वी दर गुरुवारी पाणी कपात करण्याचा निर्णय मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी घेतला होता. परंतु, आता धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे धरणे देखील बऱ्या प्रमाणात भरली आहेत, त्यामुळेच हा पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मनपा आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

नाशिकच्या धरणातून विसर्ग थांबवला

नाशिक शहराला पाणी पुरवठा करणार्‍या गंगापूर धरणातील विसर्ग हा थांबवण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाने हा निर्णय घेतला असून गेल्या पाच दिवसांपूर्वी हा विसर्ग 3000 क्यूसेक पर्यंत वाढविण्यात आला होता. आता गंगापूर धरणात 76 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने समाधान व्यक्त होत आहे

इतर बातम्या:

फांद्या तोडण्याच्या नावाखाली झाडावर इलेक्ट्रिक कटर, 15 बगळ्यांच्या मृत्यूने हळहळ

चिमुकल्या शिवराजचं आयुष्य एका प्रसंगांनं बदललं, 16 कोटींचं इंजेक्शन मोफत मिळालं, एका लकी ड्रॉनं नाशिकच्या डोंगरे कुटंबांची चिंता दूर

Nashik Municipal Commissioner Kailas Jadhav said water cut decision cancel due to sufficient water in dam

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI