चिमुकल्या शिवराजचं आयुष्य एका प्रसंगांनं बदललं, 16 कोटींचं इंजेक्शन मोफत मिळालं, एका लकी ड्रॉनं नाशिकच्या डोंगरे कुटंबांची चिंता दूर

विशाल डावरे आणि किरण डावरे यांच्या गोंडस बाळाला एका दुर्मिळ आजाराची लागण झाली होती. त्याच नाव आहे.एसएसए वन..हा एक जेनेटिक अनुवंशिक आजार आहे.

चिमुकल्या शिवराजचं आयुष्य एका प्रसंगांनं बदललं, 16 कोटींचं इंजेक्शन मोफत मिळालं, एका लकी ड्रॉनं नाशिकच्या डोंगरे कुटंबांची चिंता दूर
विशाल डावरे शिवराज डावरे
Follow us
| Updated on: Aug 01, 2021 | 11:48 PM

नाशिक: तुमचं नशीब जर बलवत्तर असेल ना. तर तुमच्या पुढे संकटांचा डोंगर जरी उभा ठाकला ना..तरी मात्र त्यातून तुम्हाला मार्ग मिळू शकतो.. मग तुम्हाला वाटलं असेल,नेमक अस झालं तरी काय ? तर मग अगोदर नाशिकमधील या  बाळाची गोष्ट वाचा. नाशिकच्या त्या बाळाचं नाव बाळाचं शिवराज आहे. सद्या शिवराजच वय दोन वर्षे पूर्ण होईल. त्याचा हसरा चेहरा खूप काही सांगून जातोय. आणि हे त्याच्या आई वडीलांचा देखील चेहरा तेच सांगतोय. विशाल डावरे आणि किरण डावरे यांच कुटुंब काही दिवसांपूर्वी असं काही खचलं होतं,की त्यातून ते सावरेल यांचं किंचित स्वप्न ही त्यांना कधी पडलं नाही.

नेमकं काय झालं होतं?

विशाल डावरे आणि किरण डावरे यांच्या गोंडस बाळाला एका दुर्मिळ आजाराची लागण झाली होती. त्याच नाव आहे.एसएसए वन..हा एक जेनेटिक अनुवंशिक आजार आहे.यामुळे स्नायू कमकुवत होतात.म्हणजे हा आजार दहा हजारांतून एखाद्या मुलाला होऊ शकतो.आणि त्याच आजाराचा बळी शिवराज ठरला होता..आणि यावर उपचार म्हणून zolgensma हे तब्बल 16 कोटी रुपयांच इंजेक्शन देणं आवश्यक होतं.

संकटानं मान झुकवली

इतका आकडा ऐकल्यावर या कुटुंबाला धक्काच बसला होता..मात्र शिवराजच नशीब इतकं काही पक्क होत,की त्याच्यापुढे या संकटाने ही मान झुकवली. चक्क अमेरिकेच्या डरबीन कंपनीने काढलेल्या लकी ड्रॉ मध्ये भारतातून एकमेव शिवराजचा नंबर लागला. यामुळं तब्बल 16 कोटी रुपयांच इंजेक्शन शिवराजला मोफत दिल गेलं. बर इतकंच नाही तर यावरील 6 कोटी रुपये टॅक्स ही या कंपनीने दिला. म्हणजे 22 कोटी रुपये या कंपनीने दिले. अखेर शिवराजला या दुर्मिळ आजारा वरच महागड इंजेक्शन मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटल मध्ये देण्यात आलं. आपल्या बाळासाठी वेळप्रसंगी किडनी देण्यासाठी तयार झालेल्या या बापाला आणि आईला हा आनंद गगनात मावेनासा झालाय.

आमच्या मुलाचा जन्म 6 ऑगस्ट 2019 मध्ये जन्म झाला. त्यानंतर एक वर्ष होऊन गेल्यानंतर त्याला एसएसए वन हा याचा त्रास होऊ लागला होता. डॉक्टरांनी आजारसंदर्भात माहिती दिल्यानंतर आम्हाला धक्का बसला होता. नाशिकमध्ये डॉक्टरांचा रिपोर्ट आल्यानंतर त्याचा आजार डिटेक्ट झाला. त्यानंतर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार घेण्यास सुरुवात केली. अमेरिकेतल्या लकी ड्रॉ काढणाऱ्या कंपनीची माहिती मिळाली. मुंबईतल्या डॉक्टरांना 16 कोटी रुपये भरणं अशक्य असल्याचं सांगितलं. आम्ही बाळासाठी जमीन आणि दोघांच्याही किडण्या देखील द्यायला तयार झालो होतो, असं किरण डावरे सांगितलं आहे.डिसेंबरमध्ये लकी ड्रॉद्वारे इंजेक्शन मिळालं. त्याच्या हालाचालींमध्ये 25 टक्के परिणाम दिसून आला आहे, असं विशाल डावरे यांनी सांगितलं.

इतर बातम्या:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगलीच्या दौऱ्यावर, कृष्णा-वारणेच्या पुरामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करणार

पालघरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची मनाई असताना धरणात पोहायला गेला, पाण्याचा अंदाज न आल्याने युवकाचा बुडून मृत्यू

Nashik Vishal Dongare son Shivraj Dongare got 16 crore injection free in lucky draw of darbin company of America

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.