मंत्र्यांचे आजोबा-पणजोबाही वारीला जातात, वारीचा निर्णय विचार करूनच: छगन भुजबळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही निर्बंध घालून वारीसाठी दहा पालख्यांनाच परवानगी दिली आहे. त्याचं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (chhagan bhujbal ) यांनी समर्थन केलं आहे.

मंत्र्यांचे आजोबा-पणजोबाही वारीला जातात, वारीचा निर्णय विचार करूनच: छगन भुजबळ
छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री

चंदन पुजाधिकारी, टीव्ही9 मराठी, नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही निर्बंध घालून वारीसाठी दहा पालख्यांनाच परवानगी दिली आहे. त्याचं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी समर्थन केलं आहे. मंत्रिमंडळात असलेल्यांच्या घरातील आजोबा-पणजोबांपासून सगळे वारी करतात. त्यामुळे वारीचा निर्णय विचार करूनच घेतला आहे, असं सांगतानाच ज्यांना राजकारणच करायचं आहे, त्यांना रोखू शकत नाही, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. (ncp leader chhagan bhujbal first reaction on ashadi wari restrictions)

छगन भुजबळ यांनी मीडियाशी बोलताना वारीबाबतच्या सरकारच्या भूमिकेचं समर्थन केलं. मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या आजोबा-पणजोबांपासून अनेकजण वारी करतात. पण कोरोना वाढू नये म्हणूनच सरकारने काही निर्णय घेतला आहे. लग्नात सुद्धा 50 लोकांना आपण परवानगी दिली आहे. विचार करूनच निर्णय घेतला आहे. तो प्रतिष्ठेचा विषय करू नये. ज्यांना राजकारण करायचं आहे. त्यांना रोखू शकत नाही, असं सांगतानाच वारीबाबत कुणी तरी निर्णय जाहीर करायचा होता. तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला आहे, असं भुजबळ म्हणाले.

भुजबळांचं सूचक विधान

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल भेट झाली. त्यावरही भुजबळांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पवार-प्रशांत किशोर भेटले. त्यामुळे निश्चितपणे त्यांच्यात काही तरी चर्चा झालीच असेल, असं सूचक विधान करून भुजबळांनी या भेटीचं गूढ अधिकच वाढवलं आहे.

मराठा समाज समजदार

नक्षलवाद्यांनी मराठा आरक्षणावर काढलेल्या पत्रकाची माहिती नसल्यांच ते म्हणाले. ते पत्रं मी काही वाचलेलं नाही. मराठा समाज समजदार आहे. सगळ्या गोष्टी सगळ्यांना समजू लागल्या आहेत, असं ते म्हणाले. खासदार संभाजी छत्रपती हे समतोल विचार करणारे आहेत. ते नक्कीच विचार करून निर्णय घेतील, असं एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितलं. (ncp leader chhagan bhujbal first reaction on ashadi wari restrictions)

 

संबंधित बातम्या:

वारीची परंपरा टिकली पाहिजे, पण कुंभमेळ्यात घडलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दक्षता: अजित पवार

मानाच्या 10 पालख्यांना आषाढी वारीसाठी परवानगी; अजित पवारांची मोठी घोषणा

शरद पवार-प्रशांत किशोर भेटीचा अजेंडा काय?; ‘ते’ 5 मुद्दे ज्यांच्यावर भेटीत चर्चा होऊ शकते!

(ncp leader chhagan bhujbal first reaction on ashadi wari restrictions)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI