रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, महाराष्ट्रातील ‘या’ मार्गावरील एक्स्प्रेस सुरु होणार

कोरोना संसर्ग आणि प्रवाशांची घटलेली संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं अनेक मार्गांवरील गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, महाराष्ट्रातील 'या' मार्गावरील एक्स्प्रेस सुरु होणार
भारतीय रेल्वे

नाशिक: कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रात ब्रेक द चैन अंतर्गत निर्बंध लावण्यात आले होते. आंतर जिल्हा प्रवासाला देखील ई-पास अत्यावश्यक करण्यात आला होता. परिणामी कोरोना संसर्ग आणि प्रवाशांची घटलेली संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं अनेक मार्गांवरील गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, महाराष्ट्रासह देशातील कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. रेल्वे प्रशासनानं काही गाड्या पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. मनमाड आणि नाशिककरांची जीवनवाहिनी समजली जाणारी मनमाड – मुंबई पंचवटी एक्सप्रेस होणार सुरू करण्यात येणार आहे. मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस 26 जून पासून सुरु करण्यात येणार आहे. (Railway decided to start Manmad Mumbai Panchvati Express and Mumbai Jalana Jan Shatabdi express)

मुंबई जालना जनशताब्दी एक्सप्रेस 25 जूनपासून सुरु

कोरोनाची कमी होणारी रुग्णसंख्या आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई – जालना जनशताब्दी एक्सप्रेस ही 25 तारखेपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या पाहता रेल्वे प्रशासनाने दोन्ही रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक महापालिकेच्या बहुचर्चित बससेवेची ट्रायल रन पूर्ण

नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीनं महत्वाची असलेल्या नाशिक महापालिकेच्या बहुचर्चित बससेवेची ट्रायल रन पूर्ण झाली आहे. प्रवाशांची चढ उतार करून बस धावल्या. 1 जुलै पासून प्रत्यक्ष बससेवेला सुरुवात होणार आहे. शहरातील पाच मार्गांवर पहिल्या टप्प्यात बस धावणार आहेत. अडीच वर्षांपासून रखडलेल्या बस सेवेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून प्रकल्प साकारण्यात आला आहे. सर्वपक्षीय विरोधानंतर देखील बससेवेला हिरवा कंदील देण्यात आला होता.

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 3 कोटींवर

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग काही दिवस घट पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा वाढ झाली. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत आठ हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 50 हजार 848 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 1 हजार 358 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. देशभरातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडाही आता तीन कोटींच्या पार गेला आहे.

संबंधित बातम्या:

मी सीमा ओलांडली नाही, आव्हाडांनी दखल न घेतल्याने मुख्यमंत्र्यांकडे, अजय चौधरींची रोखठोक प्रतिक्रिया

बुलडाण्यात पुरेशा पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

(Railway decided to start Manmad Mumbai Panchvati Express and Mumbai Jalana Jan Shatabdi express).

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI