AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाणीदार उत्तर महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या वादळवाऱ्याने नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज कोसळण्याचे प्रकारही घडले आहेत.

पाणीदार उत्तर महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Oct 07, 2021 | 1:07 PM
Share

नाशिकः नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या वादळवाऱ्याने नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज कोसळण्याचे प्रकारही घडले आहेत.

सध्या वायव्य भारतात मान्सूनच्या परतीसाठी अनुकूल परिस्थिती आहे. कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार 6 ते 9 ऑक्टोबरच्या काळात उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे शाहीन वादळाचा शनिवारी (9 ऑक्टोबर) आणि रविवारी (10 ऑक्टोबर) उत्तर महाराष्ट्राला जबर तडाखा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रात परतीच्या पावसाचे 16 ते 18 ऑक्टोबर आणि राजस्थानमध्ये 13 ते 14 ऑक्टोबर दरम्यान आगमन होण्याची शक्यता आहे. मात्र, मध्य व दक्षिण भारतात मान्सून आणखी काही दिवस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पुन्हा 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जवळपास 25 ऑक्टोबर नंतर पावसाळी वातावरण हटण्याचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्याकडे यंदा सुरुवातीच्या काळात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे धरणे तळाला गेली. शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले. मात्र, सप्टेंबर महिन्यात लावलेल्या जोरदार हजेरीने त्याने सारी कसर भरून काढली. मनमाड, नांदगाव परिसरात दोन दोनदा ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाली. यंदा नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आला. दुसऱ्या पुलावेळी तर रामसेतू पुलाजवळ पाणी पोहचले. या पावसाने जिल्ह्यातील गंगापूर धरण समूह भरला आहे.

पाणीपातळी वाढली

नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण भरले आहे. गंगापूर धरण समूहात गंगापूर (मोठे), काश्यपी (मध्यम), गौतमी गौदावरी (मध्यम) आणि आळंदी (मध्यम) ही चार धरणे आहेत. यातील सारीच धरणे भरली आहेत. त्यामुळे यंदा नाशिककरांची पाणी चिंता मिटली आहे. दुसरीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणारे इगतपुरी तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण भरले आहे. त्यामुळे तूर्तास मुंबईकरांचाही पाणीप्रश्न मिटला आहे. वैतरणा धरण गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये भरले होते. यावर्षी त्याला भरण्यासाठी एक महिन्याचा उशीर लागला.

वीज कोसळून शेतकरी ठार

नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबक तालुक्यात वीज पडून एक शेतकरी जागीच ठार झाला. 10 शेळ्यांचा मृत्यू झाला, तर माय-लेकीसह एकाच कुटुंबातील पाच जण बेशुद्ध पडल्याची घटना घडली. पहिल्या घटनेत चंद्राची मेट येथे रामू रामचंद्र चंद्रे हे तरुण शेतकरी (वय 38) रानात गुरे चारत होते. दुपारी त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत तालुक्यातील सामुंडी येथे एका झाडावर वीज कोसळली. या झाडाजवळच्या घरातील रंजना वसंत लोमटे (वय 45) व त्यांच्या तीन मुली व मुलगा यांना वीजेचा जबर झटका बसला. त्यात रंजना थोडावेळ बेशुद्ध पडल्या. तर त्यांची नऊ वर्षांची मुलगी छायाला रुग्णालयात दाखल करावे लागले. तिची एक बाजू पूर्णतः बधीर झाली आहे, तर इतर दोन मुली अपेक्षा (वय 14) आणि अक्षरा (वय 11) यांच्या हाताला झटका पडून बेशुद्ध पडले. मात्र, त्यांची प्रकृती ठीक आहे. तिसऱ्या घटनेत अंबई माळरानावर वीज पडली. या घटनेत येथे चरणाऱ्या दहा शेळ्या जागीच ठार झाल्या.

इतर बातम्याः

नाशिकमध्ये 122 नगरसेवक गॅसवर; कुठला प्रभाग कुठे जोडणार, यावर राजकीय गणित ठरणार!

महापालिकेआधीच राजकीय धुळवड; नाशिकमध्ये 15 ऑक्टोबरपासून तब्बल 192 सहकारी संस्थांच्या निवडणुका

प्राणवायू स्वयंपूर्णतेकडे नाशिकची वाटचाल; केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण

Follow Us
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी: धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
भावेश कावरेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून राज्यात संताप: मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
नीट परीक्षा आणि तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार