लोकांनी एकावेळी किती बोटं दाबायची? प्रभाग रचनेवरुन राज ठाकरेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज  ठाकरे यांनी नाशिकमध्ये महाविकासआघाडी सरकारच्या प्रभागरचनवेर टीकास्त्र सोडलं आहे. प्रभागांची तोडफोड करुन आपल्याला हवे तसे प्रभाग करणे योग्य नाही, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

लोकांनी एकावेळी किती बोटं दाबायची? प्रभाग रचनेवरुन राज ठाकरेंचा हल्लाबोल
Raj Thackeray

नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज  ठाकरे ( Raj Thackeray Ward System) यांनी नाशिकमध्ये महाविकासआघाडी सरकारच्या प्रभागरचनवेर टीकास्त्र सोडलं आहे. प्रभागांची तोडफोड करुन आपल्याला हवे तसे प्रभाग करणे योग्य नाही. लोकांनी एकाऐवजी तीन तीन बोटं का दाबायची. निवडणूक आयोगाने दखल घ्यावी, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहेय  कायदे वेगवेगळे का ? २-३-४ प्रभाग हा खेळ कसला? उद्या २-२ आमदारांचा, खासदारांचा प्रभाग करणार आहे का? ग्राम पंचायत, जिल्हा परिषदेला प्रभाग नाही, महापालिकेला प्रभाग का? यांच्या फायद्यासाठी हे आहे का? आम्ही आमचे मार्ग अवलंबू, पण आता लोकांनी विरोध करावा, कोर्टात जावं, निवडणूक आयोगाकडे जावं, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

लोकांनी कोणत्या नगरसेवकाला भेटायचं?

कुठलाही नगरसेवक काम करु देत नाही, प्रभागामध्ये कामं होत नाही. उद्या लोकांनी ठरवलं नगरसेवकाला भेटायचं आहे, तर कोणत्या नगरसेवकाला भेटायचं? यांनी निवडणुकीची थट्टा करुन टाकली आहे. गृहित धरणं सुरु आहे त्याविरोधात लोकांनी कोर्टात जावं, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

प्रभागरचनेचा राज्य सरकारनं उद्देश सांगावा

आम्ही बोललं की राजकीय वास येतो. चार प्रभाग होते, त्याचे तीन का, दोन होते त्याचे चार प्रभाग का, सरकारने नेमका आपला उद्देश का हे सांगावं. गेल्या दहा वर्षात हा खेळ सुरु आहे. आपण फक्त उघड्या डोळ्याने बघत राहायचं का?, असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.

मूळ प्रश्नांकडं दुर्लक्ष करण्यासाठी सुरुयं का?

किती वैयक्तिक पातळीवर जायचं कळत नाही, साप काय बेडूक काय, सगळा बेडूक करुन टाकलाय कानफाटात काय मारु वगैरे, कुठल्या पदांवर आपण बसलोय हे ध्यानात ठेवायला हवं. हे सगळेच जण एकमेकांना फोन करुन सांगतात की काय कळत नाही, की आपण मुख्य प्रश्न बाजूला ठेवून या विषयांवर बोलू.. मूळ प्रश्नांवर दुर्लक्ष करण्यासाठीच हे सुरु आहे की काय … टीव्ही, न्यूज चॅनलवरही तेच, असं राज ठाकरे म्हणाले.

माजी गृहमंत्री ईडीला येडं समजले

सरकारच्या कोरोनाच्या लाटा थांबतच नाहीत. टोलवरुन आम्ही आंदोलनं केली, अनेक टोल बंद झाले. सरकार आणि विरोधक येतात तेव्हा त्यांना तुम्ही प्रश्न विचारा. शरियतसारखा कायदा आणा, त्याशिवाय सुधारणार नाहीत. त्याचं कारण म्हणजे भीती नाही उरली कशाची. माजी गृहमंत्र्यांना ईडी बोलावते, ते जात नाहीत, ते ईडीला येडा समजतात, असा टोला राज ठाकरेंनी अनिल देशमुख यांना लगावला  आहे.

इतर बातम्या: 

नारायण राणेंच्या अटकेचा आदेश काढणारे नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे राज ठाकरेंच्या भेटीला

महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरे पेटतील हे विसरु नका, सामनातून राज्यपाल कोश्यारींना उघड इशारा

Raj Thackeray slam mva government over ward system for local body elections decision taken by Uddhav Thackeray Government of MVA

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI