बायको गेली माहेरी, नवरा दारु ढोसून टॉवरवरी! आनंदात प्यायला की विरहात? नेमकं काय घडलं?

बायको गेली माहेरी, नवरा दारु ढोसून टॉवरवरी! आनंदात प्यायला की विरहात? नेमकं काय घडलं?
मोबाईल टॉवरवर चढलेला नवरा!

आदिवासी तरुण दिलीप ज्ञानेश्वर मोरे याचे आपल्या बायकोसोबत कौटुंबिक वादातून जोरदार भांडण झालं. कडाक्याच्या भांडणानंतर दिलीपची बायको त्याला न सांगता सोडून माहेरी निघून गेली.

उमेश पारीक

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 22, 2022 | 6:27 PM

निफाड : घरात कडाक्याचं भांडण झाल्यानंतर एका बायकोनं नवऱ्याचं घर सोडून ती न सांगताच माहेरी गेल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, निराश झालेल्या नवऱ्यानं चक्क मोबाईल टॉवरवर चढून हायव्होलेज ड्रामा केलाय. ही सगळी घटना निफाड (Niphad) तालुक्यामध्ये घडली आहे. न सांगता बाहेर माहेरी गेल्यानं संतप्त नवऱ्याचे मोबाईल टॉवरवर (Mobile Tower) चढला आणि तब्बल तीन तास तिथंच बसून होता. पत्नी सोडून गेल्याचं दुःख सहन झाल्यानं दारुच्या नशेत पतीनं मोबाईल टॉवरवर चढून ड्रामा केलाय. दरम्यान, याबाबत कळल्यानंतर लगेचच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आलं होतं. त्यानंतर अखेर शोलेतल्या (Sholey Movie) वीरुस्टाईल वर चढलेल्या या मज्नू पतीला खाली उतरवण्यात आलं.

नेमका कुठला प्रकार?

निफाड येथील जळगाव फाट्याजवळ ही घटना घडली आहे. या फाट्याजवळ असलेल्य बीएसएनएलच्या मोबाईल टावरच्या जवळच झोपडीत राहत असलेला आदिवासी तरुण दिलीप ज्ञानेश्वर मोरे याचे आपल्या बायकोसोबत कौटुंबिक वादातून जोरदार भांडण झालं. कडाक्याच्या भांडणानंतर दिलीपची बायको त्याला न सांगता सोडून माहेरी निघून गेली. पत्नी सोडून गेल्याने त्याला दुःख सहन झाले नाही. त्यामुळे दारूच्या नशेत तो थेट बीएसएनएल कंपनीच्या साडे तीनशे फूट उंचीच्या टॉवरवर चढून बसला. तब्बल तीन तास त्याचा हा हायवोल्टेज ड्रामा सुरु होता.

शोलेच्या वीरुलाही लाजवलं

अगदी शोलेतील बसंतीच्या विरुला या नवरोबाने मागे टाकले की काय? असा प्रश्न बघ्यांना पडला होती. या घटनेची माहिती निफाड पोलिसांना मिळताच घटनास्थळी निफाड पोलिस दाखल झाले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अग्निशामक दलालादेखील पाचारण करण्यात आले. दरम्यान, ज्या मोबाईल टॉवरवर ही घटना घडली, त्या ठिकाणी दिलीप मोरे यांचा भाचा आला.

मामाला खाली उतरवण्यासाठी त्याने दिलीपकडे असलेल्या मोबाईलचा नंबर पोलिसांना दिला. पोलिसांनी मोबाईल फोनवर संपर्क साधून दिलीपची मनधरणी करत समजूत काढली. अखेर तीन तासानंतर दिलीप हा बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरवरून खाली उतरला. यावेळी सुदैवाने त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. त्याच्यावर पोलिसांनी कुठलीही कारवाई न करता त्याला सोडून दिले.

संबंधित बातम्या :

हिंगोलीत पती-पत्नीच्या नात्याला काळिमा, नवऱ्यानेच घडवून आणला बायकोवर बलात्कार

नेरुळमध्ये जन्मदात्यांकडून पोटच्या पोरांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड

धक्कादायक ! पुण्यातन गुंडांच्या टोळक्याकडून अल्पवयीन मुलावर गोळीबार


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें