सिन्नर, निफाडमध्ये कोरोना रुग्णसंख्या तीन आकडी; येवल्यातही 76 जणांवर उपचार सुरू

नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर, निफाड आणि येवल्यात कोरोना रुग्णांचा आकडा म्हणावा तितका खाली येताना दिसत नाहीय. मंगळवारी सिन्नरमध्ये 161, निफाडमध्ये 152 आणि येवल्यामध्ये 76 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते.

सिन्नर, निफाडमध्ये कोरोना रुग्णसंख्या तीन आकडी; येवल्यातही 76 जणांवर उपचार सुरू
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 3:25 PM

नाशिकः नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर, निफाड आणि येवल्यात कोरोना रुग्णांचा आकडा म्हणावा तितका खाली येताना दिसत नाहीय. मंगळवारी सिन्नरमध्ये 161, निफाडमध्ये 152 आणि येवल्यामध्ये 76 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 3 लाख 99 हजार 896 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 778 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये फक्त पाचने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 648 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. नाशिक ग्रामीणमधल्या नाशिकमध्ये 52, बागलाण 4, चांदवड 33, देवळा 2, दिंडोरी 20, इगतपुरी 1, कळवण 6, मालेगाव 4, नांदगाव 11, निफाड 152, पेठ 1, सिन्नर 161, त्र्यंबकेश्वर 2, येवला 76 अशा एकूण 525 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 231, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 16 तर जिल्ह्याबाहेरील 6 रुग्ण असून अशा एकूण 778 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 9 हजार 322 रुग्ण आढळून आले आहेत.

लॉकडाऊनचा उद्या शेवटचा दिवस

अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिककरांमागे चिंतेचा भुंगा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर आणि नाशिकमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील तब्बल 61 गावांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक 24, श्रीगोंदा तालुक्यातील 9, राहाता तालुक्यातील 7 तर पारनेर तालुक्यातील 6 गावांसह अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये 13 ऑक्टोबरपर्यत कडक लॉकडाऊन असणार आहे. मात्र, यामुळे नाशिकरांची चिंता वाढली आहे. कारण नाशिकमधल्या सिन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत रुग्ण वाढत आहेत. सिन्नर तालुक्यातील नागरिकांचा नगरशी सातत्याने संबंध येतो. त्यामुळे येथील रुग्ण वाढत असल्याची शंका आहे.

लसीकरणाचा खेळखंडोबा

मालेगावमधल्या संगमेश्वर वॉर्डात जुलै महिन्यात लसीकरण मोहीम राबवली. यात 2 जुलै 2021 रोजी कर्तव्यावर असणाऱ्या शिक्षकांनी 13 जणांना कोविड लस न देताच प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले असून याप्रकरणी दहा शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील 3 लाख 99 हजार 896 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 778 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये पाचने घट झाली आहे. – डॉ. अनंत पवार, जिल्हा नोडल अधिकारी

इतर बातम्याः

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांच्या नावे सिन्नरमध्ये अफाट ‘माया’; पुनुमिया पिता-पुत्राच्या नावे खरेदी, नाशिक पोलिसांकडून तपास सुरू

अपार्टमेंटमध्ये नागोबा डोलाया लागला, हजार रुपयांसाठी ‘कोब्रा’ अडकावला दारावर; नाशिकमध्ये सर्पमित्राची नसती उठाठेव

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.